पुणे - पत्नीच्या बाहेरख्यालीपणाला कंटाळून पतीने भररस्त्यात चाकूने गळा चिरून पत्नीचा खून केला. त्यानंतर पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला. हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत शनिवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. अंजली निकम (वय 22) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर नितीन निकम याला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, अंजली आणि नितीन यांचा सहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना चार वर्षाचा मुलगा देखील आहे. हे सर्व भोसरीतील चक्रपाणी वसाहत येथे राहत होते. नितीन हा भोसरीतीलच एका कंपनीत काम करत होते. मृत अंजली हिचे बाहेर अनैतिक संबंध होते. पत्नीच्या या बाहेरख्यालीपणामुळे दोघा पती-पत्नी दररोज भांडण होत होते. वारंवार समजून सांगूनही तिच्या वर्तणुकीत फरक पडत नव्हता. माफी मागितल्यानंतर ती पुन्हा पुन्हा तोच प्रकार करीत होती, असे आरोपीचे म्हणणे आहे.
दरम्यान, दोघेही पती-पत्नी हडपसर येथे अंजली हिच्या माहेरी आले होते. तेथून ते त्यांच्या मूळगावी जाणार होते. मात्र पत्नीने गावाकडे जाण्यास नकार दिला आणि प्रियकरासोबत राहणार असल्याचे पतीला सांगितले. त्यानंतर नितीनने स्वतःचा चार वर्षीय मुलाला भावासोबत गावाकडे पाठवले. त्यानंतर काही वेळातच मुलगा गावाकडे जाण्यास तयार नाही, त्याला परत घेऊन येऊयात, असे सांगून तिला घेऊन तो दुचाकीने जाण्यासाठी निघाला.
हडपसर परिसरातून दुचाकीने जात असताना त्याने लघु शंकेच्या निमित्ताने बंटर स्कूलच्या पाठीमागे दुचाकी थांबवली. लघुशंका करून परत येतो असे सांगून तो दूर निघून गेला. त्यानंतर पाठीमागून येऊन त्याने पत्नी अंजली हिचा कांदा कापण्याच्या सुऱ्याने गळा चिरून खून केला. या सर्व प्रकारानंतर नितीन याने भावाला फोन करून घडलेला सारा प्रकार सांगितला आणि स्वतः आत्महत्या करणार असल्याचे देखील सांगितले होते. परंतु भावाने मनधरणी केल्यानंतर तो स्वतः हडपसर पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.
हेही वाचा - नाना पटोले महाराष्ट्राचे पप्पू, चंद्रकांत पाटलांचा पलटवार
हेही वाचा - पुण्यातील 'या' व्यक्तीने सर्वप्रथम माहिती अधिकारात मिळवली होती माहिती, आतापर्यंत केले पाचशेहून अधिक अर्ज