ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवड शहर हळूहळू पूर्वपदावर; मॉल्सधारक मात्र चिंतेत

उद्योग नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात अनेक छोटे-मोठे उद्योग आहेत. कोरोना लॉकडाऊनमुळे गेल्या साडेचार महिन्यांपासून सर्व व्यवसाय बंद होते. जून महिन्यात व्यावसायिकांना महानगरपालिकेने अटी आणि शर्तींसह व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, शहरातील मोठ-मोठे मॉल्स सुरू करण्यास बंदीच होती. गेल्या बुधवारी(५ ऑगस्ट) मॉल्स उघडण्यास परवानगी देण्यात आली.

Mall
मॉल
author img

By

Published : Aug 9, 2020, 4:30 PM IST

पुणे - साडेचार महिन्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील मॉल्स, हॉटेल्स आणि इतर व्यवसाय अटी आणि शर्तीसह सुरू झाले आहेत. त्यामुळे शहर आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारपासून सुरू करण्यात आलेल्या मॉल्समध्ये नागरिक जाण्यास उत्सुक नसल्याचे चित्र आहे. ग्राहकांचा अत्यल्प प्रतिसाद पाहून मॉल्समधील छोटे-मोठे व्यावसायिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

पिंपरी-चिंचवड शहर हळूहळू पूर्वपदावर

उद्योग नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात अनेक छोटे-मोठे उद्योग आहेत. कोरोना लॉकडाऊनमुळे गेल्या साडेचार महिन्यांपासून सर्व व्यवसाय बंद होते. जून महिन्यात व्यावसायिकांना महानगरपालिकेने अटी आणि शर्तींसह व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, शहरातील मोठ-मोठे मॉल्स सुरू करण्यास बंदीच होती. गेल्या बुधवारी(५ ऑगस्ट) मॉल्स उघडण्यास परवानगी देण्यात आली. मॉलधारक आपल्या प्रत्येक ग्राहकांच्या काळजी पोटी सर्व आवश्यक असलेल्या गोष्टी करत आहेत. हात सॅनिटाईझ करणे, टेम्परेचर तपासणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे याची काटेकोर अंमलबजावणी करत आहेत. असे असूनही मॉलच्या कुठल्याच दुकानात ग्राहक दिसत नाहीत. मात्र, शहरातील मॉल्स, हॉटेल्स आणि इतर व्यवसाय खुले झाल्याने शहर हळूहळू पूर्वपदावर येत असल्याची भावना जागृत होत आहे.

मॉल आणि दुकाने सुरू झाली असली तरी पहिल्या सारखी ग्राहकांची गर्दी नाही. पूर्वी व्यवसाय चांगला चालायचा. मात्र, कोरोनाने होत्याचे नव्हते केले. सध्या तरी व्यवसाय ठप्प आहे. शासनाने दिलेल्या अटी आणि शर्तींचे पालनकरून मॉलमधील दुकान ग्राहकांसाठी खुले केले आहे, असे व्यावसायिक अश्विनी मिटकर यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहरात दररोज हजारो कोरोनाबाधित रूग्ण आढळत असून शेकडो जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील बाधित रुग्णांचा आकडा 28 हजार पार पोहचला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे. मॉल, हॉटेल्स आणि इतर व्यवसायांना अटी आणि शर्थीसह मुभा देण्यात आली असली तरी कोरोना आपल्यातून गेलेला नाही. कोरोना कोणालाही होऊ शकतो. त्यामुळे आपण स्वतः खबरदारी घेणे आवश्यक आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळणे, तोंडावर मास्क वापरावा, असे आवाहनही त्यांनी केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.