ETV Bharat / state

बारामतीत अजित पवारांची 'अशीही' बॅटिंग - sharad pawar birthday program

शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी क्रिकेटच्या सामन्याचे आयोजन केले होते. सामान्य कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव होमग्राऊंड असलेल्या बारामतीमध्ये अजित पवारांनी क्रिकेटच्या मैदानात जोरदार बॅटिंग केली असल्याचे पाहावयास मिळाले.

maha deputy cm ajit in cricket match baramati
बारामतीत अजित पवारांची 'अशीही' बॅटिंग
author img

By

Published : Dec 27, 2020, 6:02 PM IST

Updated : Dec 27, 2020, 6:16 PM IST

बारामती (पुणे) - माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत क्रिकेटचे सामने भरवण्यात आले होते. यावेळी राजकीय मैदानात सडेतोड टोलेबाजी करण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बॅट हाती घेऊन जोरदार फटकेबाजी केली.

अजित पवारांनी केलेल्या फटकेबाजीची दृश्य.

शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी क्रिकेटच्या सामन्याचे आयोजन केले होते. सामान्य कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव होमग्राऊंड असलेल्या बारामतीमध्ये अजित पवारांनी क्रिकेटच्या मैदानात जोरदार बॅटिंग केली असल्याचे पाहावयास मिळाले.

हेही वाचा - सरकार पाडण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांना पाच वर्षे उलटून गेलेली कळणार नाही- रोहित पवार

'दादा' उचलून मारा -

अजित पवार खुद्द मैदानात आल्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांना बॅटिंग करण्याचा आग्रह केला. कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यामुळे त्यांनीही बॅट हातात घेतली. उचलून मारा असं म्हणत कार्यकर्त्यांनी त्यांच्या नावाने एकच घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी मोठ्या उत्साहाने आलेला बॉल चांगलाच टोलावला.

Last Updated : Dec 27, 2020, 6:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.