ETV Bharat / state

आईपासून दुरावलेले बछडे पुन्हा आईच्या कुशीत

शिरुर तालुक्यातील नागरगाव येथे कांतीलाल धुमाळ यांच्या शेतात उसतोडणी सुरु असताना तीन बिबट्याची पिल्ले आढळुन आली होती. पिल्लांची त्यांच्या आईपासून ताटातूट झाली होती. बछडे आणि बिबट्याची (मादी) भेट घडवण्यात वन विभाग आणि माणिकडोह बिबट निवारण केंद्र यांच्या माध्यमातून यश आले आहे.

author img

By

Published : Nov 20, 2019, 10:03 PM IST

आईपासून दुरावलेले बछडे पुन्हा आईच्या कुशीत

पुणे - शिरुर तालुक्यातील नागरगाव येथे कांतीलाल धुमाळ यांच्या शेतात उसतोडणी सुरु असताना तीन बिबट्याची पिल्ले आढळुन आली होती. पिल्लांची त्यांच्या आईपासून ताटातूट झाली होती. बछडे आणि बिबट्याची (मादी) भेट घडवण्यात वन विभाग आणि माणिकडोह बिबट निवारण केंद्र यांच्या माध्यमातून यश आले आहे.

हेही वाचा - जळगाव शालेय पोषण आहार योजनेच्या बिलांची 'खिचडी'; विद्यार्थी नसतानाही पावणे दोन कोटींची बिले!

बिबट्याच्या पिल्लांना त्याच परिसरात आईकडे सोपवण्याचा निर्णय घेत 500 मीटर अंतरावर कॅमेरा ट्रॅप लावून पिल्ले ठेवण्यात आली होती. मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता बछड्यांची आई तेथे आली. तीने 6:43 ला पहिले पिल्लू ताब्यात घेतले नंतर 7:23 ला दुसरे व 7:53 ला तिसरे पिल्लू घेऊन ती आपल्या निवाऱ्याला गेली. रात्री 8 वाजेपर्यंत तीनही पिल्ले आईच्या कुशीत परत विसावली होती. यामध्ये एक नर व दोन मादी पिल्ले होती. पिल्ले परत केल्यामुळे आई चिडून हल्ले करत नाही व पिल्लांचे पुढील जिवन आईसोबत जात असल्याचे बिबट निवारा केंद्राचे डॉ. अजय देशमुख यांनी सांगितले.

माय लेकराच्या भेटीचा हा अनोखा क्षण वन विभागाच्या कॅमेऱ्यात कैदही झाला. जुन्नर, शिरुर, आंबेगाव, खेड तालुका हा बिबट्याप्रवण क्षेत्र आहे. या परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्याचा अधिवास मोठा आहे. त्यामुळे उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्या आणि मानव संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. ऊसतोडणीदरम्यान अनेक बछडे आईपासून दुरावतात. या दुरावलेल्या बछड्यांना पुन्हा त्यांची आई परत मिळवून देण्यासाठी वन विभाग व माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्राचे रेस्क्यू पथक मदत करते.

हेही वाचा - आजपासून इफ्फीची सुरूवात, अमिताभ बच्चनसह रजनीकांत राहणार उपस्थित

Intro:Anc_शिरुर तालुक्यातील नागरगाव येथे कांतीलाल धुमाळ यांच्या शेतात उसतोडणी सुरु असताना तीन बिबट्याची पिल्लं आढळुन आली होती या तीन पिल्लांची आईपासून ताटातूट झाली होती त्यांची आई भेट घडवण्यात वन विभाग आणि माणिकडोह बिबट निवारण केंद्र यांच्या माध्यमातून यश आले आहे.

या बिबट्याच्या पिल्लांना त्याच परिसरात आईकडे सोपवण्याचा निर्णय घेत 500 मीटर अंतरावर कॅमेरा ट्रॅप लावून पिल्ले ठेवण्यात आली काल सायंकाळी 6:30 ला मादी तिथे आली, 6:43 ला पाहिले पिल्लू ताब्यात घेतले नंतर 7:23 ला दुसरे व 7:53 ला तिसरे पिल्लू घेऊन गेली. रात्री 8 वाजेपर्यंत तीनही पिल्लू आई च्या कुशीत परत विसावली होती यामध्ये एक नर व दोन मादी होत्या. पिल्लं परत केल्यामुळे आई चिडून हल्ले करत नाही व पिल्लांचे पुढील जीवन आई सोबत जात असल्याचे बिबट निवारा केंद्राचे डॉ अजय देशमुख यांनी सांगितले

माय लेकराच्या भेटीचा हा अनोखा क्षण वन विभागाच्या कॅमेऱ्यात कैदही झाला.जुन्नर शिरुर,आंबेगाव,खेड तालुका हा बिबट्याप्रवण क्षेत्र आहे. या परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्याचा अधिवास मोठा आहे. त्यामुळे उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्या आणि मानव संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. ऊसतोडणीदरम्यान अनेक बछडे आईपासून दुरावतात. या दुरावलेल्या बछड्यांना पुन्हा त्यांची आई परत मिळवून देण्यासाठी वन विभाग व माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्राचे रेस्क्यू पथक मदत करत आहे.Body:....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.