पुणे : नवीन वर्षाची सुरुवात होत असताना, मागील वर्षाचा पुणे शहरातील मोठ्या ( Look Back 2022 ) घडामोडींचा ( Pune Year Ender 2022 ) आढावा घेण्याचा प्रयत्न करूया. पुणे ( Pune Special Year Ending 2022 ) शहरातील राजकीय ( Pune Political Year Ender 2022 ), सामाजिक, आर्थिक, भौगोलिक, क्रिडा, गुन्हे जगतात काय काय ( Economic Pune Year Ender 2022 ) घडामोडी घडल्या याबाबत आपण आढावा घेणार आहोत.
राजकारण : पालकमंत्री चंद्रकांत पाटील : याच वर्षाच्या सुरुवातीला राज्यात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आले होते. त्यावेळेस जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हाती जिल्ह्याचे सूत्र होते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्यात सत्तांतर करण्यात आले. पुणे जिल्ह्याला एक नवीन पालकमंत्री मिळाला. पुण्यातील कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांची उच्च व तंत्र शिक्षण मंत्रीपदी निवड करण्यात आली व जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनदेखील त्यांची निवड करण्यात आली.
जिल्ह्यात शिंदे गटात शिवसैनिकांचा पक्ष प्रवेश : राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड पुकारल्यानंतर राज्यातील पुणे जिल्हा असा एकमेव जिल्हा आहे त्यात शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात त्यांची साथ दिली. पुणे शहरातील नगरसेवक नाना भानगिरे यांनी सर्वप्रथम शिंदे गटात प्रवेश केला.आणि पक्षाला बळ दिले. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचे तीन वेळा खासदार असलेले माजी खासदार आढळराव पाटील यांनीदेखील शिंदे गटात प्रवेश केला. तसेच, पुरंदर येथील माजी मंत्री विजय शिवतारे यांनीदेखील शिंदे गटात प्रवेश करून मुख्यमंत्री पुन्हा शिंदे यांना मोलाची साथ दिली.
उदय सामंत यांच्यावर दगडफेक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड पुकारल्यानंतर मोठ्या प्रमाणात त्यांच्याबरोबर 50 आमदारांनी देखील बंड पुकारला होता.यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट होती. उदय सावंत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर पुणे दौऱ्यावर असताना कात्रज चौकातच शिवसेनेचे युवा नेते तसेच माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली होती या सभेनंतर उदय सावंत यांची गाडी कात्रज चौकातच उभी असताना शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला.आणि या घटनेत तब्बल 10 हून अधिक शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
सुषमा अंधारे यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकरल्यानंतर त्यांच्याबरोबर 40 हून अधिक आमदारांनीदेखील शिवसेनेतून बंड पुकारला होता. यावेळी शिवसेना संपते की काय असे राज्यात चित्र निर्माण झाले होते. त्यावेळेस सध्या राज्यभर चर्चेचा विषय आणि एकूणच आपल्या वक्तव्याने सत्ताधाऱ्यांची झोपमोड करणारे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी त्यावेळेस उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आणि पक्षाला एक मोठा बळ निर्माण करून दिला.
वसंत मोरे यांचे नाट्य : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंगे विरोधात भूमिका घेतल्यानंतर पुणे शहरात त्याचे पडसाद मोठ्या प्रमाणात उमटले त्यावेळेस पुणे शहराचे तत्कालीन शहराध्यक्ष वसंत मोरे यांना पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका पटली नाही आणि त्यांनी ती परखडपणे मांडली.त्यावेळेस पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी साईनाथ बाबर यांची शहराध्यक्षपदी निवड केली. त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर येऊ लागली आणि सातत्याने या वर्षभरात वसंत मोरे विरुद्ध पुणे शहरातील पक्षातील पदाधिकारी यांच्या संघर्ष पाहायला मिळत आहे.
चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाही फेक : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले,कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विषयी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलने करण्यात आली.पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे पिंपरी चिंचवड येथे दौऱ्यावर असताना दोन भीमसैनिकांच्या वतीने त्यांच्यावर शाही फेक करण्यात आली त्यानंतर या प्रकरणात या दोघांना तसेच एका पत्रकाराला अटक देखील करण्यात आली याच्या पडसाद राज्यभर उमटले आणि भाजप विरुद्ध भीमसैनिक असा संघर्ष पाहायला मिळाला.
सामाजिक....
चांदणी चौक : फक्त पुणे शहर नव्हे तर देशभर चर्चेचा विषय असलेला चांदणी चौक येथील उड्डाणपूल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा दौऱ्यावर असताना पुण्यातील चांदणी चौक येथील वाहतूक कोंडीत ते अडकले आणि त्यानंतर चांदणी चौक येथील उड्डाणपूल पाडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर चांदणी चौक कधी पडणार याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आणि एकूणच दिल्ली येथे जी इमारत ज्या कंपनीने पाडली त्यालाच चांदणी चौक येथील उड्डाणपूल पाडण्याचा काम देण्यात आला आणि बरोबर दोन ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजल्याच्या सुमारास सुमारे सहाशे किलो स्फोटक वापरून हे उड्डाणपूल पाडण्यात आले आहे.
गुन्हेगारी.....
पुणे पोलीस आयुक्त यांची 112 मोक्काअंतर्गत कारवाई...
राज्यातील एकही पोलीस अधिकाऱ्याला अशी कामगिरी करता आली नाही. जी कामगिरी पुणे शहरातील तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी त्यांच्या दोन वर्ष तीन महिन्यांच्या कार्यकाळात केली त्यांनी या संपूर्ण कार्यकाळात तब्बल 112 मो अंतर्गत कारवाई करून तब्बल 600 हून गुन्हेगारांवर वर कारवाई केली आहे.
14 हजार 500 सेक्सटॉर्शनच्या तक्रारी : पुणे शहरात या वर्षभरात मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हेगारी मध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे. पुणे शहरात या वर्षभरात तब्बल साडेचौदा हजार सेक्सटॉर्षन बाबतच्या तक्रारी सायबर पोलिसांच्या कडे प्राप्त झाल्या आहेत.याच सेक्सटॉर्षन च्या त्रासाला कंटाळून पुण्यात दोन युवकांनी आत्महत्या देखील केली या प्रकरणी पुण्यातील दत्तवाडी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
गुंड गजा मारणे याला अटक : फक्त मुळशी तालुका नव्हे तर राज्यभर दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगार गजा मारणे याला पोलिसांनी सातारा येथून अटक केली. खंडणी तसेच विविध गुन्ह्यांबाबत काही महिन्यांपासून गजा मारणे पोलिसांना चकवा देत होता आणि अखेर मारणे याला पुणे पोलिसांकडून पकडण्यात यश आले आहे.
पीएफआयवर छापेमारी... : एनआयएकडून देशभर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संस्थेच्या कार्यालयांवर छापेमारी करण्यात आली तसेच पुण्यात देखील कोंढवा येथील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया यांच्या कार्यालयावर छापीमारी करत तब्बल तीन जणांना अटक करण्यात आली.यांच्या निषेधार्थ पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आलं आणि या आंदोलनात पाकिस्तान जिंदाबाद चे नारे देण्यात आल्याचं आरोप करण्यात आलं.
पुणे स्टेशन येथे मिळाला बॉम्ब : पुणे रेल्वे स्थानक येथे 13 मे रोजी स्पोर्ट घडून आणण्यासाठी वापरली जाणाऱ्या वस्तू सारखी एक वस्तू सापडल्याने मोठ्या प्रमाणात खडबड उडाली होती. पुणे रेल्वे स्थानकावर तीन जिलेटच्या काड्या सापडल्या होत्या.त्या निकामी करण्याची कारवाई पोलिसांकडून करण्यात आली होती मात्र हे बॉम्ब सदृश्य वस्तू जेव्हा सापडली तेव्हा मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली होती.हा बॉम्ब असल्याची त्यावेळेस अफवा देखील उठवण्यात आली होती.
सांस्कृतिक, कला क्षेत्रातील घडामोडी
कोविडमुक्त गणेश उत्सव : गेली दोन वर्ष निर्बंधमध्ये गणेश उत्सव साजरा केल्यानंतर यंदा मात्र निर्बंध मुक्त गणेशोत्सव राज्यभर साजरा करण्यात आलं आहे. पुणे शहरातील वैभव असलेल हा गणेशोत्सव यंदाच्या वर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.यंदा मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात यंदाचा हा गणेशोत्सव तब्बल 46 तास निर्बंध मुक्त गणेश उत्सव साजरा करण्यात आला.
विक्रम गोखले निधन : महाराष्ट्राच्या नटसम्राट मराठी चित्रपट सृष्टीतील महान अभिनेता विक्रम गोखले यांचं दीर्घ आजाराने दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये पहाटेच्या सुमारास निधन झालं त्यांच्या निधनाच्या आधीच निधन झाल्याच्या अफवा सोशल माध्यमातून प्रसिद्ध झाल्या होत्या.
नव्याने उभे राहणार बालगंधर्व : मराठी रंगभूमीसाठी मानाच्या असणाऱ्या बालगंधर्व नाट्य मंदिराचा पाडून त्या ठिकाणी भव्य असं नाट्यगृह उभारण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला. पण याला नाट्य क्षेत्रातील कलावंत यांच्या वतीने विरोध केला जात आहे.
अपघात...
नवले ब्रीज 48 गाड्या अपघात, आठवडा भर अपघात सत्र : पुणे शहर नव्हे तर राज्यभर चर्चेचा विषय म्हणजे नवले ब्रिज येथील अपघात... 20 नंबर रोजी रात्री साडे आठ वाजल्याच्या सुमारास नवले ब्रिज येथे एका ट्रक चालकाकडून एक नव्हे दोन नव्हे तब्बल 48 गाड्यांना धडकून अपघात झाल्याची घटना घडली होती. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र या हा अपघात खूपच भयावह असल्याचं अपघात झालेल्या गाड्या मालकांना होत. यानंतर सातत्याने या नवले ब्रिजवर आठवडाभर अपघातांचा सत्र सुरू होतं दररोज दोन ते तीन गाड्यांचा अपघात या नवले ब्रिजवर होत होता.
खेळ...
प्रो खो खो स्पर्धा : प्रो कबड्डीच्या धरतीवर तब्बल 25 राज्यांमधून खेळाडूंना एकत्र आणत पुण्यातील बालेवाडी येथे प्रथमच खो-खो स्पर्धा घेण्यात आली ही स्पर्धा 14 ऑगस्ट रोजी येथील बालेवाडी येथे संपन्न झाली तब्बल सहा संघांचा या स्पर्धेत सहभाग होता आणि याची अंतिम फेरी चार सप्टेंबर रोजी केली गेली 25 राज्यातून तब्बल 240 खेळाडू हे या स्पर्धेत सहभागी झाले होते.
प्रो कब्बडी : सध्या सुरू असलेल्या प्रो कबड्डी स्पर्धेतील पुणेरी पलटण या पुण्याच्या संघाचे सामने पुण्यातील बाले स्टेडियम बालेवाडी स्टेडियम येथे पार पडले जिल्ह्यातील सर्व कबड्डी शौकिकांनी या स्पर्धेचा लाभ घेतला.Conclusion: