ETV Bharat / state

lonavala food poisoning case : पुण्यात काल्याच्या महाप्रसादातून 29 जणांना विषबाधा; 4 जण गंभीर

लोणावळ्यातील (lonavala) भडवली गावात सप्ताह सुरू होता, यावेळी काल्याच्या कीर्तननंतर महाप्रसाद खाल्ल्यामुळे 29 नागरिकांनाी विषबाधा (lonavala food poisoning case) झाल्याचे सांगण्यात येत आहे. या रुग्णांवर सध्या खासगी आणि सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

lonavala
पुण्यात काल्याच्या महाप्रसादातून 29 जणांना विषबाधा
author img

By

Published : Nov 22, 2021, 12:17 PM IST

लोणावळा (पुणे) - लोणावळ्याजवळील (lonavala) भडवली गावातील काही नागरिकांना विषबाधा (lonavala food poisoning case) झाल्याचे समोर आले आहे. गावात सप्ताह होता, काल्याचे कीर्तन झाल्यानंतर जेवनातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. एकूण 29 जणांना विषबाधा झाली असून चार जणांची प्रकृती गंभीर आहेत. त्यांना औंध जिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्यात आले आहे. अशी माहिती डॉ. वर्षा पाटील (Dr. Varsha Patil) यांनी दिली असून यात लहान मुले आणि वृद्ध व्यक्तीचा समावेश असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

महाप्रसादातून नागरिकांना विषबाधा -

भडवली गावात सप्ताह होता, काल्याचे कीर्तन होताच महाप्रसाद खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याचे नागरिक आणि डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. या रुग्णांवर सध्या खासगी आणि सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गेल्या महिन्याभरापासून भडवली येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सप्ताहच आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांची सांगता दोन दिवसांपूर्वी झाली तेव्हा तेथील नागरिकांना विषबाधा झाली आहे.

चार जणांची प्रकृती गंभीर -

महाप्रसाद खाल्ल्यानंतर भाविकांना उलट्या, जुलाब आणि डोकेदुखाची त्रास व्हायला लागला. यानंतर सर्व भाविकांना तात्काळ स्थानिक सरकारी आणि खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यापैकी चार लोकांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येते आहे.

हेही वाचा - Car-Container Accident : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; चौघांचा मृत्यू तर 8 जण जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.