ETV Bharat / state

मावळ मतदारसंघ: पार्थ पवारांना पराभवाचा धक्का; बारणेंनी राखला मावळचा 'गड' - parth pawar

राष्ट्रवादी काँग्रसचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांन पराभवाचा धक्का बसला आहे. याठिकाणी शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा विजय झाला आहे.

पार्थ पवार आणि श्रीरंग बारणे यांच्यात टक्कर
author img

By

Published : May 23, 2019, 6:06 AM IST

Updated : May 23, 2019, 5:45 PM IST

LIVE UPDATE -

  • पार्थ नव्हे , तर अजित पवार यांचा पराभव - श्रीरंग बारणे
  • पार्थ पवारांना पराभवाचा धक्का; बारणेंनी राखला मावळचा 'गड'
  • 12.18 - पार्थ पवार 1 लाख 51 हजार मतांनी पिछाडीवर, बारणेंची जोरदार मुसंडी
  • 11.50 - पार्थ पवार 1 लाख 35 हजार 302 मतांनी पिछाडीवर
  • 11.30 - श्रीरंग बारणे - 354875, पार्थ पवार - 242241
  • 11.10 - पार्थ पवार 91 हजार मतांनी पिछाडीवर
  • 10.55 - बारणेंच्या आघाडीचा वेग वाढला, पार्थ पवार 81 हजार मतांनी पिछाडीवर
    10.45 - श्रीरंग बारणे - 245043, पार्थ पवार - 170556
  • 10.35 - श्रीरंग बारणे - 229821, पार्थ पवार - 161002
  • 10.20 - श्रीरंग बारणे - 202363, पार्थ पवार - 145140
  • 9.40 - श्रीरंग बारणे - 97,388 मते
  • 9.40 पार्थ पवार - 74,770 मते
  • 9.10 - श्रीरंग बारणे 9 हजार मतांनी आघाडीवर
  • 9.00 - पार्थ पवार आघाडीवर
  • 8.30 - पोस्टल मतमोजणीला सुरुवात

पुणे - मावळ लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून शिवसेनेचे वर्चस्व राहिलेल्या या बालेकिल्ल्यात पवार कुटुंबीयांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, तरीही पार्थ पवार यांचा पराभव झाला आहे. या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा 2 लाखांच्या मताधिक्याने विजय झाला आहे. त्यामुळे हा पवार कुटुंबीयांना मोठा धक्का आहे.

मावळमध्ये पार्थ नव्हे, तर अजित पवार यांचा पराभव - श्रीरंग बारणे

लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेत नव्याने तयार झालेला मावळ लोकसभा मतदारसंघ २०१९ ला तिसऱ्या निवडणुकीला सामोरे गेला होता. पुणे जिल्ह्यातील ३ आणि रायगड जिल्ह्यातील ३ विधानसभा मतदारसंघांना एकत्र करून नव्याने तयार झालेला हा मतदारसंघ आहे. राजकीय, ऐतिहासिक आणि भौगोलिक विविधतेचं एक उत्तम उदाहरण म्हणजे मावळ लोकसभा मतदारसंघ. आतापर्यंत झालेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये इथे शिवसेनेचा खासदार निवडून आल्याने तिसऱ्या वेळीही शिवसेनेचाच भगवा फडकला आहे. श्रीरंग बारणे यांनी हॅट्रिक मारत आपला गड राखला आहे.

मावळ मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून -

मतदारसंघाच्या पुनर्रचनेत नव्याने तयार झालेल्या या मतदारसंघाने पहिली निवडणूक पाहिली ती २००९ मध्ये. या निवडणुकीत लढत झाली ती राष्ट्रवादी काँग्रेसचे आझम पानसरे आणि शिवसेनेच्या गजानन बाबर यांच्यात. त्यात बाबर यांनी तब्ब्ल ८० हजारहून अधिक मतांनी विजय मिळवला. बाबर यांना ३ लाख ६४ हजार ८५७ मते मिळाली. तर पानसरे यांना २ लाख ८४ हजार २३८ मते मिळाली. २०१४ मध्येही राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असाच सामना रंगेल अशी चिन्हं होती. पण ऐनवेळी लक्ष्मण जगताप यांनी बंडखोरी करत शेतकरी कामगार पक्षात उडी घेतली आणि राष्ट्रवादीला शेवटच्या क्षणी उमेदवार शोधण्यासाठी धावा धाव करावी लागली. अखेर राहुल नार्वेकर यांना बळीचा बकरा करत राष्ट्रवादीने उमेदवार शोधला. तर शिवसेनेकडून पुन्हा गजानन बाबर यांना संधी मिळेल असे वाटत असताना अखेरच्या क्षणी श्रीरंग बारणे यांना उमेदवारी मिळाली.

सलग ५ वेळा संसदरत्न पुरस्कार मिळवणारे बारणे विरुद्ध राजकारणात पाऊल ठेवणारे नवखे पार्थ पवार यांच्यात ही लढत झाली होती.

मावळ लोकसभा मतदारसंघात पार्थ पवार केवळ उमेदवार होते. मात्र, प्रत्यक्षात अजित पवार निवडणूक लढवत होते. त्यामुळे हा अजित पवार यांचा पराभव आहे, अशी प्रतिक्रिया मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे विजयी उमेदवार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केली आहे.

Intro:Body:

ELECTION_MAVAL_AKSHAY

Conclusion:
Last Updated : May 23, 2019, 5:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.