पुणे - शिरूर लोकसभा मतदारसंघात दिग्गज शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी पराभव केला. आढळराव पाटील हे मागील 15 वर्षांपासून या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडूण आले होते. मात्र, यंदा त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या निवडणूकीत अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटलांचा ६३ हजार मतांनी पराभव केला.
विजयानंतर प्रतिक्रिया देताना अमोल कोल्हे म्हणाले, हा विजय राष्ट्रवादीसह सगळ्या मित्रपक्षाचा विजय आहे. स्थानिक नेते तसेच दिलीप वळसे पाटील आणि अजित पवार यांच्या अचूक नियोजनामुळे आणि शरद पवार यांच्या मार्गदर्शनाने हा विजय मिळाला, असल्याचं त्यांनी सांगितलं.
LIVE UPDATE -
- 2:30 - डॉ. अमोल कोल्हे 58 मतांनी आघाडीवर
- 1:45 - सतरावी फेरी, डॉ. अमोल कोल्हे 49 हजार मतांनी आघाडीवर
- 12:30 - अकरावी फेरी, डॉ. अमोल कोल्हे 37 हजार मतांनी आघाडीवर
- 11:45 नववी फेरी, डॉ. अमोल कोल्हे 14621 मतांनी आघाडीवर
- 11:30 - आठवी फेरी, डॉ. अमोल कोल्हे 17686 मतांनी आघाडीवर
- 10:45 - सातवी फेरी, डॉ. अमोल कोल्हे 8813 आघाडीवर
- 10:15 - सहावी फेरी, अमोल कोल्हे 19757 मतांनी आघाडीवर
- 10:00 - अमोल कोल्हे पाचव्या फेरी अखेर 14207 मतांनी आघाडीवर, तर शिवाजीराव आढळराव पाटील पिछाडीवर
- 9:45 - अमोल कोल्हे चौथ्या फेरी अखेर 16450 मतांनी आघाडीवर, तर शिवाजीराव आढळराव पाटील पिछाडीवर
- 9:14 - अमोल कोल्हे 13444 मतांनी आघाडीवर, तर शिवाजीराव आढळराव पाटील पिछाडीवर
- 8:50 - अमोल कोल्हे 9540 मतांनी आघाडीवर; शिवाजीराव आढळराव पाटील पिछाडीवर
- 8:30 - महाआघाडीचे अमोल कोल्हे आघाडीवर, तर युती शिवाजीराव आढळराव पाटील पिछाडीवर
- शिरुर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणीला सुरूवात झाली असून काही वेळात पहिला निकाल हाती येईल.
पुणे - शिरूर लोकसभा मतदारसंघ सध्या महाराष्ट्रात चर्चेत आहे. थोड्याच वेळात शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी आणि पुणे येथे मतमोजणीला सुरूवात होणार आहे. या मतदारसंघातील लढत ही अत्यंत तुल्यबळ समजली जात आहे. येथून युतीने मागील 15 वर्षांपासून खासदार असलेले शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना चौथ्यांदा तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीने अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना मैदानात उतरले आहे. त्यामुळे आढळराव पाटलांसमोर कडवे आव्हान निर्माण झाले आहे. यंदाच्या निवडणुकीत आढळराव पाटील विजयाचा 'चौकार' मारणार की अमोल कोल्हे त्यांना 'क्लीन बोल्ड' करुन दिल्ली गाठणार हे येत्या काही तासातच स्पष्ट होईल.शिरूर लोकसभा मतदारसंघावर मागील 10 वर्षांपूर्वी विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची पकड भक्कम असतानाही शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटलांना मोठे मताधिक्य मिळाले होते. मात्र, यावेळी हे मताधिक्य कमी करण्यासाठी राष्ट्रवादीकडून काँग्रेसकडून स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी देऊन आढळरावांच्या 'चौकाराला' क्लीनबोल्ड करण्यासाठी भक्कम फिल्डिंग लावल्याचे दिसून येत आहे.
२०१४ च्या निवडणुकीत शिरुर लोकसभा मतदारसंघात 59.72 टक्के मतदान झाले होते. मात्र, यंदाच्या 2019 च्या निवडणुकीत याच मतदारसंघात 64.54 टक्के मतदान झाले आहे. यामुळे वाढलेला टक्का कोणाच्या बाजूने असणार हे येत्या काही तासांमध्ये स्पष्ट होईल. मात्र, या मतदारसंघात कोण निवडूण येणार हे सांगणे कठीण असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
2014 ची परिस्थिती -
शिवाजीराव आढळराव पाटील यांनी 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या देवदत्त निकम यांचा तब्बल 3 लाख 1 हजार 453 मतांनी पराभव केला होता. 2014 च्या निवडणुकीत आढळराव पाटलांना 6 लाख 43 हजार 415 मते मिळाली होती. शिरूर लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा क्षेत्रांचा समावेश होतो. यामध्ये 3 ठिकाणी भाजपचे, 2 जागेवर शिवसेनेचे तर एका ठिकाणी राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे.