ETV Bharat / state

पुणे मतदारसंघ : मोहन जोशींना पराभवाचा धक्का; गिरीश बापटांना मिळाली 'दिल्ली'वारी

पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या मोहन जोशी यांना पराभवाला सामोरे जावे लागले. येथे गिरीश बापट यांचा जवळपास २ लाखांच्या मताधिक्क्याने विजय झाले आहे.

गिरीष बापट दिगिरीष बापट दिल्ली गाठणार की मोहन जोशील्ली गाठणार की मोहन जोशी
author img

By

Published : May 23, 2019, 6:05 AM IST

Updated : May 23, 2019, 6:49 PM IST

LIVE UPDATE -

  • मोहन जोशींना पराभवाचा धक्का; गिरीश बापटांना मिळाली 'दिल्ली'वारी
  • काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी मतमोजणीच्या प्रक्रियेला आक्षेप घेतल्याने मतमोजणी संथगतीने सुरू
  • 2.10 - गिरीश बापट 80 हजार मतांनी आघाडीवर
  • 12.40 - गिरीश बापट 55 हजार मतांनी आघाडीवर
  • 11.40 - गिरीश बापट 43 हजार मतांनी आघाडीवर
  • 11.00 - गिरीश बापट 33 हजार मतांनी आघाडीवर
  • 9.25 - गिरीश बापट 15 हजार मतांनी आघाडीवर
  • 8.55 - मोहन जोशी मतमोजणीच्या ठिकाणी दाखल, जिंकून येणारच - मोहन जोशी
  • 8.35 - गिरीश बापट आघाडीवर
  • 8.10 - मतमोजणीला सुरुवात

सविस्तर अपडेट्स -

काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी मतमोजणीच्या प्रक्रियेला आक्षेप घेतल्याने मतमोजणी संथगतीने सुरू

पुणे लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी अद्यापही सुरू आहे. मतमोजणीची प्रक्रिया संथगतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्याकडून वारंवार मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेतला जात असल्याने मतमोजणीची प्रक्रिया लांबली आहे.

दरम्यान, पहिल्या फेरी पासूनच गिरीश बापट यांनी सर्व सहा विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतल्याचे चित्र दिसून आले आतापर्यंतच्या सर्व साथ फेऱ्यांमध्ये गिरीश बापट मोठ्या फरकाने आघाडीवर आहेत आणि त्यांच्या विजयाची जास्त शक्यता आहे. दरम्यान, मतमोजणीचे कल येताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे.

पुणे - पुण्यातून गिरीष बापट दिल्ली गाठणार हे आता निश्चित झाले आहे. काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांना पराभवाचा धक्का बसला आहे. येथे भाजपचे गिरीश बापट यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यामुळे पुणेकरांनी पुन्हा एकदा भाजपला कौल दिल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्रातील महत्त्वाचे आणि वेगाने विकसित होणारे शहर म्हणून पुणे शहराकडे पाहिले जाते. पुणे लोकसभा मतदारसंघ तसा मिश्र नागरी वस्तीचा शहरी मतदारसंघ आहे. झोपडपट्टीपासून उच्चभ्रू वस्तीपर्यंत सर्वच स्तरातील मतदार या मतदारसंघात सामावलेले आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे ८ मतदारसंघ आहेत. वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती, पुणे कँटोन्मेंट, हडपसर, कसबा पेठ आणि खडकवासला असे हे विधानसभा मतदारसंघ आहेत.

पुण्यात १९५१ पासून २००९ पर्यंत झालेल्या १४ लोकसभा निवडणुकांमध्ये मतदार हा सातत्याने काँग्रेसच्या बाजूने उभा राहिला होता. या मतदारसंघात १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे अण्णा जोशी विजय झाले होते. १९९९ च्या निवडणुकीत प्रदीप रावत यांनी भाजपसाठी विजयश्री खेचून आणला होता, मात्र पुन्हा काँग्रेसकडे हा मतदारसंघ गेला. २०१४ च्या मोदी लाटेत येथून भाजपचे अनिल शिरोळे हे खासदार झाले. त्यांनी काँग्रेसच्या विश्वजीत कदमांचा पराभव केला होता. शिरोळे हे ३ लाख १५ हजार ७६९ इतक्या विक्रमी मताधिक्क्याने विजयी झाले होते. आत्ताच्या निवडणुकीमध्येही पुणेकरांनी भाजपला कौल देत गिरीश बापट यांनी विजयी केले आहे.

Intro:Body:

ELECTION_PUNE_AKSHAY

Conclusion:
Last Updated : May 23, 2019, 6:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.