पुणे : पुणे शहरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. काल रात्री लक्ष्मीपूजन झाल्यानंतर शहरात झालेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीने (Firecracker Fireworks Pune) शहरात 17 ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. तर याच रंगबेरंगी फटाक्यांनी पुण्यातील नर्हे भागातील एक मुलगा जखमी झाला (little boy injured in firecracker explosion) आहे. शिवांश अमोल दळवी असे या जखमी मुलाचे नाव आहे. (Firecracker Accident Boy Injured Pune) काल रात्री दहा वाजल्यााच्या सुमारास ही घटना घडली (little boy injured in firecracker explosion) आहे. जखमी मुलाची प्रकृती आता ठीक आहे. (Latest news from Pune) (Pune Crime)
फटाका फोडताना चिमुकला जखमी - काल रात्री लक्ष्मीपूजन झाल्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती. शिवांश हा रात्री घराच्या बाहेर फटाके फोडत असताना रंगबेरंगी पाऊस पडणारा फटाका फोडताना शिवांश हा जखमी झाला आहे.
फटाके फोडताना घ्या काळजी- गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करावी यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. तसेच फटाकेमुक्त दिवाळीसाठी अनेक संस्था संघटनांच्या माध्यमातून जनजागृती देखील केली जाते; पण असे असले तरी अश्या या फटाक्यांच्या आतिषबाजीने मोठ्या प्रमाणावर आगीच्या घटना घडत आहे. या घटनेनंतर पालकांनी देखील खबरदारी घेतली पाहिजे.