पुणे Landlord Murdered Case: भाडेकरूने मालकाचा खून केला आहे. पुण्यातील हडपसर रस्त्यावरील उरुळी देवाची परिसरात ही घटना घडली आहे. (Pune massacre) संतोष राजेंद्र धोत्रे असं अटक केलेल्या संशयिताचं नाव आहे. तर दादा ज्ञानदेव घुले असे हत्या झालेल्या घरमालकाचं नाव आहे. (Tenant murder of landlord)
आधी मारहाण नंतर हत्या: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी धोत्रे हा घुले यांच्या चाळीत भाडेकरू आहे. सोमवारी दुपारी धोत्रे दारू पिल्यानंतर घरात झोपायला गेला. त्यावेळी घुले यांनी घरासमोर दुचाकीचा जोरजोरानं हॉर्न वाजवला. त्यामुळे झोपमोड झाल्यानं धोत्रेनं घुले यांना मारहाण केली. यानंतर त्यानं पार्किंगमध्ये घरमालक घुलेची हत्या केली.
कुटुंबीयांकडून बेपत्ता झाल्याची तक्रार: घुले रात्री उशिरापर्यंत घरी न आल्यामुळं कुटुंबीयांनी ते बेपत्ता झाल्याची पोलिसात तक्रार दिली. चौकशीदरम्यान घुले आणि धोत्रे यांच्यात सोमवारी भांडण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.
घरभाडं मागितल्यानं मालकाची हत्या: भाडेकरूने घरमालकाची हत्या केल्याची अशीच एक घटना नागपुरात कळमना पोलीस ठाणाच्या हद्दीत 14 सप्टेंबर, 2019 रोजी घडली होती. रामलाल जायस्वाल असं मृताचं नाव होतं. रामलाल हे मध्यप्रदेशच्या रिवा येथील रहिवासी होते. त्यांचे एक घर आदर्श नगर येथेही आहे. ते रिवा येथे वास्तव्यास असल्यानं त्यांनी नागपुरातील घर अंकुश नावाच्या व्यक्तीला भाड्यानं दिलं होतं. गेल्या अनेक महिन्यांपासून अंकुश भाडे देत नसल्यानं रामलाल भाडे मागण्यासाठी गेले असताना अंकुशनं त्यांच्यासोबत वाद घातला होता. त्यानंतर अंकुशनं आपल्या साथीदारांच्या मदतीनं रामलाल जायस्वाल यांची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच कळमना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी अंकुश विरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवला असून आरोपी फरार आहे.
हेही वाचा: