पुणे - वटपौर्णिमा हा महिलांच्या जिव्हाळ्याचा सण मानला जातो. महिला वर्षभर या सणाची वाट पाहत असतात. पण याच सणाच्या दिवशी मनातील साऱ्या आकांक्षा बाजूला ठेऊन एक महिला पोलीस कर्मचारी आज भामा-आसखेड जलवाहिनीच्या कामाला लावलेल्या बंदोबस्तात वडाशेजारीच बसुन होती.
आज वटपौर्णिमा निमित्त धामणे फाटा येथील वडाला महिला पुजन करत होत्या. यावेळी पोलीस कर्मचारी महिला वडाशेजारी बसुन आपले कर्तव्य बजावत होती. गावातील अनेक महिलांनी याठिकाणी येऊन वडाची पुजा केली. मात्र याठिकाणी येणाऱ्या एकाही महिलेने या पोलीस कर्मचारी महिलेची साधी विचारपुस ही केली नाही. हीच का माणुसकी, असा भावनिक प्रश्न या महिलेने उपस्थित केला.
या महिला पतिच्या दिर्घायुष्याची कामना करत असताना ही महिला पोलीस कर्मचारी वडाशेजारी बसून आपले कर्तव्य बजावत होती.