पुणे: कसबा-चिंचवड पोटनिवडणूकीचा निकाल गुरूवारी (2 मार्च) रोजी जाहीर होणार आहे भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप व दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले. यानंतर निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. पोटनिवडणूकीसाठी सत्ताधारी व विरोधकांकडून जोरदार प्रचार करण्यात आला. यानंतर या दोघे मतदारसंघांसाठी रविवार (26 फेब्रुवारी) रोजी मतदान पार पडेल. अनेक आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या या पोटनिवडणूकीच्या निकालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
कसबा मतदारसंघ: भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे कर्करोगाने निधन झाले. यामुळे चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. या पोटनिवडणूकीत सुरूवातीला भाजपकडून टिळक कुटुंबीयातूनच उमेदवारी जाहीर केली जाईल, असे वाटत होते. पण भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी देत त्यांच्यासाठी प्रचाराची मुहर्तमेढ रोवली. दरम्यान, टिळक कुटुंबियांना उमेदवारी जाहीर न केल्यामुळे ब्राम्हण समाज नाराज असल्याचे सांगितले जात होते. पण ही नाराजी दूर करण्यात आल्याचे भाजपकडून सांगितले गेले. भाजपने उमेदवार जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
चिंचवड मतदारसंघ: भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. या पोटनिवडणूकीत भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसचे नाना काटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. दरम्यान, ठाकरे गटाचे राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत ही अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात आहेत. कसबा मतदार संघात दुहेरी लढत तर चिंचवड येथे तिहेरी लढत पाहायला मिळाली आहे. यामुळे या तिहेरी लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अनेक आरोप प्रत्यारोप: आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली. या पोटनिवडणुकीत भाजपकडून हेमंत रासने तर महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत राज्यातील सर्वच आजी-माजी मंत्री यांच्या सभा रॅली तसेच कोपरा मीटिंग घेण्यात आले होते. निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटचे मतदान होण्यापर्यंत दोन्ही पक्षाकडून आरोप प्रत्यारोप होत होते. भाजपने या पोटनिवडणूकीत मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणकीत राजकीय पक्षांचे प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
प्रचाराला नेत्यांची मांदियाळी: कसबा आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत सुरूवातीपासून प्रचारात स्थानिक मुद्दे बाजूला आणि राज्य तसेच देशातील राजकीय परिस्थितीवर चर्चा प्रामुख्याने बघायला मिळाली. भारतीय जनता पक्षाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसेच मंत्री गिरीश महाजन या नेत्यांनी जोरदार प्रचार केला. तसेच स्थानिक खासदार गिरीश बापट आजारी असून देखील प्रचारात आले होते. दरम्यान, त्यांनी मतदानाच्या दिवशी देखील उपस्थित राहत मतदानाच हक्क बजावला. तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारात देखील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन सभा घेतली. तसेच मविआचे माजी मंत्री तसेच महाविकास आघाडीतील सर्वच नेते मंडळी यांचे प्रचारात सक्रिय सहभाग पाहायला मिळाले.
हेही वाचा: Kasba By Election 2023 : कसबा पोटनिवडणूक; मतदारसंघाचा असा आहे इतिहास...