पुणे : पुण्यातील कसबा पेठ, चिंचवड या पुण्यातल्या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये रविवारी मतदान पार पडले. तर, मतमोजणी गुरूवारी म्हणजेच 2 मार्चला होणार आहे. पण मतमोजणीच्या आधीच कसबा मतदार संघातील दोन्ही उमेदवारांच्या विजयाचे बॅनर लागले आहे. निकाला आधीच दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजीला सुरवात करण्यात आली आहे.यावर दोन्ही उमेदवारांना विचारलं असता मीच विजयी होणार असल्याचा दावा केला आहे.
दोघांनाही विजयाचा विश्वास : कसबा पोट निवडणुकीचा निकाल येत्या 2 मार्च ला जाहीर होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवारांना आपणच विजयी होणार असल्याचं विश्वास असून महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी तर मी 15 हजार मताधिक्याने विजयी होणार आहे असा विश्वास व्यक्त केला आहे.तर महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी देखील मी 25 हजार मतांनी विजयी होणार असल्याचं विश्वास व्यक्त केला आहे.
पोटनिवडणुकीत 50 टक्के मतदान : कसबा पोटनिवडणुकीत पर्वा मतदान झालं असून या मतदार संघात 50 टक्के मतदान झालं आहे.आता विजय कुणाचा होणार याचे अंदाज बाधले जात आहेत. भारतीय जनता पक्षाचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्या चुरशीची लढत होणार आहे.कसबा पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 50.06 टक्के मतदान झालं आहे. या मतदारसंघामध्ये एकूण 2,75,679 एवढे मतदार आहेत, यातल्या 1,38,018 जणांनी मतदानाचा हक्क बजावला, यापैकी 74,218 पुरुष आणि 63,800 महिलांचा समावेश होता.आत्ता या दोन्ही उमेदवारांकडून विजयाचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
आयोगाविरोधात कोर्टात जाणार- धंगेकर : याबाबत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना विचारलं असता ते म्हणाले की कसबा पोटनिवडणुकीत पूर्व,पश्चिम,दक्षिण,उत्तर या सर्व ठिकाणी मीच आघाडीवर असणार आहे.आणि जे प्रभाग क्रमांक 15 मधील सध्या चित्र दाखवण्यात येत आहे की हा प्रभाग भाजपचा बालेकिल्ला आहे.पण याच प्रभागातून मीच आघाडीवर असणार असल्याचं यावेळी धंगेकर यांनी सांगितल. तसेच ते पुढे म्हणाले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रचाराची वेळ संपली असताना देखील ते प्रभागात प्रचार तसेच पैसे वाटप करत होते.या विरोधात मी निवडणूक आयोगाच्या विरोधात कोर्टात जाणार आहे.कारण आयोगाने कोणतीही तक्रार दाखल केली नाही.आणि या विरोधात मी कोर्टात जाणार असल्याचं यावेळी धंगेकर याने सांगितल आहे.
मी 25 हजार मतांनी विजयी होणार- रासने : यावर महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांना विचारलं असता ते म्हणाले की विरोधकांकडून जे आरोप प्रत्यारोप होत आहे.ते बिनबुडाचे असून पैसे वाटण्याची संस्कृती ही आमची नाही तर विरोधकांची आहे.आणि मला विश्वास आहे की कसबा पोटनिवडणुकीत मीच मोठ्या मताधिक्याने विजयी होणार आहे.आणि की जास्तीत जास्त 25 हजार मताधिक्याने विजयी होणार असल्याचं विश्वास यावेळी रासने यांनी व्यक्त केला आहे.
राज्यातील सर्वच नेते मंडळी कसब्यात : कसबा पोटनिवडणुकीत सुरवाती पासूनच प्रचारात स्थानिक मुद्दे बाजूला आणि राज्य तसेच देशातील राजकीय परिस्थिती वर चर्चा प्रामुख्याने बघायला मिळाली. भारतीय जनता पक्षाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसेच मंत्री गिरीश महाजन तसेच स्थानिक खासदार गिरीश बापट तसेच सर्वच नेतेमंडळी प्रचारात पहायला मिळाले.तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारात देखील माजी मुख्यमंत्री,माजी मंत्री तसेच महाविकास आघाडीतील सर्वच नेते मंडळी यांचं प्रचारात सक्रिय सहभाग पाहायला मिळालं.या सर्व नेते मंडळींकडून प्रचारात कसबा मतदार संघातील स्थानिक मुद्दे कमी तर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप तसेच राज्य आणि देशातील मुद्दे प्रमुखाने मांडण्यात आले.
अनेक आरोप प्रत्यारोप : कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून दोन्ही उमेदवाराकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले खासदार गिरीश बापट यांचा मुद्दा असेल किंवा काँग्रेसकडून बंडखोरीचा मुद्दा असेल असे अनेक प्रश्न या पोटनिवडणुकीत पाहायला मिळाले विशेष म्हणजे राज्यातील सत्ता संघर्ष आणि निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय तसेच एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन हे देखील विषय याच पोटनिवडणुकीत पाहायला मिळाले.