ETV Bharat / state

Kasaba By Election : कसबा पोटनिवडणुकीसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, मतदारांनी सांगितलं, 'मतदानात १०० टक्के..'

आज 26 फेब्रूवारीला अखेर कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. 2 लाख 75 हजार 679 लोक आज मतदानाचा हक्क बजावत आहेत. यामध्ये 1 लाख 36 हजार 984 पुरुष मतदार आहेत. 1 लाख 38 हजार 690 महिला मतदार आहेत.

kasaba by election
मतदानाला सुरवात
author img

By

Published : Feb 26, 2023, 11:08 AM IST

मतदानाला सुरवात

पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीच्या मतदानाला आज 26 तारखेला सकाळपासून सुरवात झाली आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदार त्यांचा हक्क बजावणार आहेत. सकाळपासूनच नागरिक आपले हक्क बजावण्यासाठी येत आहे. त्यामुळे मतदानासाठी निवडणूक यंत्रणादेखील सज्ज झाली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

7 वाजल्यापासून मतदानाला सुरवात : पुण्यात कसबा विधानसभा मतदारसंघात आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरवात झाली आहे. एकूण 2 लाख 75 हजार 679 मतदार या मतदार संघामध्ये आहेत. 270 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. 26 फेब्रुवारीच्या मतदान प्रक्रियेसाठी 1 हजार 250 निवडणूक अधिकारी व निवडणूक कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

मोठ्या संख्येने मतदान : आज सकाळपासूनच मोठ्या संख्येने नागरिक हे मतदानाला येत आहे.विविध बूथ वर सकाळपासूनच नागरिक मतदानासाठी गर्दी करत आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या उन्हाच्या चटक्यामुळे नागरिक सकाळ च्या वेळेतच मतदान करत असल्याचं चित्र शहरात पाहायला मिळत आहे. कसबा पोट निवडणुकीच्या निमित्तानं दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारात उतरले होते.

भाजपची मोठी ताकद : भाजपने मोठी ताकद प्रचारात लावली होती. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारात सहभाग नोंदवला होता. दरम्यान, आज मतदार कोणाच्या पारड्यात मतदान टाकणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मतदानादिवशी बंदोबस्तासाठी 600 पोलीस कर्मचारी व 83 अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.प्रत्येक ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदारसंघनिहाय मतदार व कार्यरत यंत्रणा कसबा विधानसभा मतदारसंघ

मतदानासाठी तयारी : एकूण मतदार 2 लाख 75 हजार 679आहेत. एकूणमध्ये पुरुष मतदार 1 लाख 36 हजार 984 आहेत. एकूणमध्ये महिला मतदार 1 लाख 38 हजार 690 आहेत. 5 तृतीयपंथी मतदार आहेत. 270 एकूण मतदान केंद्र आहेत. मतदानासाठी 1 हजार 250 नियुक्त कर्मचारी आहेत. 27 राखीव पथके मतदानासाठी तयार करण्यात आली आहेत. पोलिस बंदोबस्तात 83 पोलीस अधिकारी व 600 पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

हेही वाचा : Kasba By Elections 2023: दोन तारखेला गुलाल मीच उधळणार- रवींद्र धंगेकरांचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.