पुणे: महामार्गावरील अपघाताचे सत्र चालूच आहे. जिल्ह्यात जुन्नर नगर कल्याण महामार्गावर भीषण अपघात झाला. दारू पिऊन नशेत असलेल्या जीप चालकाच्या हलगर्जीपणामुळे यात एका चिमुकल्यासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झाल्यांमध्ये शेतमजुरांचा समावेश आहे. रात्रीच्या अंधारात पिकप जीपने दोन दुचाकी गाड्या सह आठ जणांना गाडीखाली चिरडले. तीन जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. नगर-कल्याण महामार्गावर लवणवाडीत येथे हा भीषण अपघात झाला आहे.
आठ जणांना चिरडले: मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात दुचाकीवरून जाणारे प्रवाशी हे शेतमजूर होते. हे सर्व शेतमजूर नारायणगाव येथुन शेतातील कामे आटोपून पारनेर तालुक्यातील पळशी वनकुटे येथे घराकडे जात होते. या दरम्यान नगर-कल्याण महामार्गावर लवणवाडी येथे पिकअप जीपने दुचाकीवरून जाणाऱ्या आठ जणांना चिरडल्याची घटना घडली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे. मृतांमध्ये सुंदराबाई (वय २८ वर्षे), गौरव मधे (वय ५ वर्षे), नितीन मधे (वय २५ वर्षे) यांच्यासह एका लहान मुलाचा समावेश आहे. मृतांपैकी एकाचे नाव समजू शकलेले नाही. तर अर्चना मधे आणि सुहास मधे असे गंभीर दोन प्रवाशांची नावे आहेत. एका चिमुकल्यांसह एका व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर उपचारादरम्यान तीन जाणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन चिमुकले, दोन पुरुष आणि एक महिलेचा समावेश आहे.
तीनही वाहनांची समोरासमोर धडक: मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात तीनही वाहनांची समोरासमोर धडक झाली. यातील पिकअप जीपचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ याची माहिती पोलीसांना दिली. दरम्यान अपघातातील जखमी प्रवाशांना उपचारासाठी खाजगी रुग्णालायात दाखल करण्यात आले आहे. तर महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सरकार अनेक उपाययोजना करत आहेत. परंतु त्यानंतरही अपघातांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही.
हेही वाचा: Bus Accident Pune मुंबईहून बंगळुरूला जाणाऱ्या खासगी बसला भीषण अपघात १२ प्रवासी जखमी