पुणे Jayant Patil Reaction : राष्ट्रवादीच्या जयंत पाटील म्हणाले की, आमची मेरिटची बाजू असून आम्ही ती अध्यक्षांच्या समोर मांडणार आहोत आणि अध्यक्षांना योग्य तो निर्णय करावा लागेल. (Eknath Shinde) पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 48 वी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आलेली होती. या सभेला अध्यक्ष शरद पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, रोहित पवार, हर्षवर्धन पाटील, विश्वजित कदम असे मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सभेला येण्याचं टाळलं. (MLA Disqualification)
आमची धाकधूक वाढलेली नाही : जयंत पाटील पुढे म्हणाले की, आम्ही विधानसभा अध्यक्षांच्या समोर जाणार आहोत. त्यामुळे त्यांच्या समोर जाण्याच्या आधी अशा पूर्वगृहकलुशितपणे जाणं योग्य नाही. त्यामुळे आताच काही विधानं करणं योग्य नाही. अजित पवार आजच्या सर्वसाधारण सभेला आले नाहीत. याबाबत जयंत पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, ते का आले नाही मला माहीत नाही. त्यामुळे मी यावर काय बोलू? काल कुणीच अपात्र झालेलं नाही. प्रतोद कोण योग्य हे सुप्रीम कोर्टानं याआधी ठरवलं होतं. पण ते डावलून निर्णय घेण्यात आला. आमची अजिबात धाकधूक वाढलेली नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावर पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, निकालाच्या आधी राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री यांना भेटणं यामुळे संशय वाढला.
3 जागा सोडल्या त्याबद्दल धन्यवाद : लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात भाजपाकडून 'अब की बार 45 पार' असा नारा देण्यात आला आहे. यावर पाटील म्हणाले की, भाजपा 45 प्लस म्हणत आहे. त्यांनी उरलेल्या 3 जागा सोडल्या त्याबद्दल धन्यवाद. महाविकास आघाडीच्या जागा वाटप फॉर्म्युलाबाबत पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, जागा वाटपाबाबत दिल्लीत एक बैठक झाली आणि जागा वाटपाचा फॉर्म्युला अजूनही निश्चित झालेला नाही. दिल्लीत अजून एक बैठक होईल आणि नंतर निर्णय घेण्यात येईल. प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीमध्ये यावं, यासाठी त्यांच्याशी आमचं बोलणं सुरू आहे, असं यावेळी पाटील म्हणाले.
मोदींनी कांद्यावरची निर्यातबंदी उठवावी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं सातत्यानं वय काढलं जात आहे. याबाबत पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, ज्यांना त्यांच्याविषयी बोलायचं आहे त्यांनी बोलत राहावं. पवार यांना आता लोकांचा खूप पाठिंबा मिळाला आहे. तसंच उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक दौऱ्यावर येत आहेत. याबाबत पाटील म्हणाले की, मोदी यांनी कांद्याची निर्यात बंदी उठवली पाहिजे. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी नाराज आहे; तसं तर संपूर्ण राज्यातीलच शेतकरी नाराज आहे.
हेही वाचा: