ETV Bharat / state

Coinex Pune 2022 : पुणेकरांसाठी खुला झाला दुर्मिळ नाण्यांचा खजिना, वाचा सविस्तर - कॉईनेक्स पुणे

इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ रेअर आयटमस् ( International Collectors Society of Rare Items ) तर्फे दरवर्षीप्रमाणे 'कॉईनेक्स पुणे २०२२' ( Coinex Pune 2022 ) या राष्ट्रीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात प्राचीन काळातील नाण्यांसह छत्रपती शिवाजी महाराज ( Chhatrapati Shivaji Maharaj ) यांच्या राज्याभिषेकाच्या काळात बनविल्या गेलेल्या नाण्यांपैकी होन हे ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे नाणे अशा वैविध्यपूर्ण नाण्यांचा समावेश आहे.

Coinex Pune 2022
कॉईनेक्स पुणे
author img

By

Published : Dec 23, 2022, 7:12 PM IST

पुण्यात इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ रेअर आयटमस् तर्फे 'कॉईनेक्स पुणे २०२२' या राष्ट्रीय प्रदर्शनाचे आयोजन

पुणे : प्राचीन, मुघल, एरर अशी दुर्मिळ आणि प्राचीन नाणी, नाणक संग्राहकांची विविध विषयांवरील व्याख्याने आणि छत्रपती शिवाजी महाराज ( Chhatrapati Shivaji Maharaj ) यांच्या राज्याभिषेकाच्या काळात बनविल्या गेलेल्या नाण्यांपैकी होन हे ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे नाणे अशा वैविध्यपूर्ण नाण्यांचा समावेश असलेल्या 'कॉईनेक्स पुणे २०२२' ( Coinex Pune 2022 ) या राष्ट्रीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आयसीएसआरआयतर्फे ( International Collectors Society of Rare Items ) आयोजित राष्ट्रीय पदर्शनाचे आज उद्घाटन झाले. या प्रदर्शनाच्या माध्यमातून पुणेकरांसाठी दुर्मिळ नाण्यांचा खजिना खुला झाला असून याव्दारे दुर्मिळ नाण्यांची खरेदी-विक्री करण्याची संधी देखील प्राप्त झाली आहे.

राज्याभिषेकाच्या काळातील नाण्यांचा समावेश : इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ रेअर आयटमस् ( International Collectors Society of Rare Items ) तर्फे दरवर्षीप्रमाणे 'कॉईनेक्स पुणे २०२२' या राष्ट्रीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात प्राचीन काळातील नाण्यांसह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या काळात बनविल्या गेलेल्या नाण्यांपैकी होन हे ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे नाणे अशा वैविध्यपूर्ण नाण्यांचा समावेश आहे.

Coinex Pune 2022
कॉईनेक्स पुणे
Coinex Pune 2022
कॉईनेक्स पुणे

ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाची नाणे : ५० हून अधिक फ्रेम्स या प्रदर्शनात लावण्यात आल्या असून अतिशय दुर्मिळ अशा प्रकारचे नाणक संग्रह पुणेकरांना पाहायला मिळत आहेत. भारतातील विविध ठिकाणांहून हे संग्राहक या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. अतिप्राचीन नाणी या प्रदर्शनात बघायला उपलब्ध असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या काळात बनविल्या गेलेल्या नाण्यांपैकी होन हे ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे नाणे या प्रदर्शनात पहायला मिळत आहे.

Coinex Pune 2022
कॉईनेक्स पुणे
Coinex Pune 2022
कॉईनेक्स पुणे

ब्रिटीश कालीन नाणे प्रदर्शनात : ब्रिटीश काळात वारण्यात आलेले मेडल, एरर कॉईन्स, स्टेट कॉईन्स, वर्ल्ड कॉईन्स, शिवराई आणि मराठा कॉईन्स आणि दुर्मिळ असे वर्ल्ड कलर कॉईन्स या प्रदर्शनात मांडले आहेत. तसेच बॉम्बे पोस्ट कार्डचा इतिहास आणि जागतिक कागदी चलनाविषयी सविस्तर माहिती याठिकाणी प्रदर्शित करण्यात आली आहे. यानिमित्त दुर्मिळ नाण्यांची खरेदी आणि विक्रीची संधी पुणेकरांना मिळाली आहे. तसेच यानिमित्त तुमच्याकडे उपबल्ध असलेल्या नाण्यांची ओळख, अंदाजे किंमत, त्यांचे वर्ष, इतिहास, त्यावरील अक्षरे, चित्र, ठसे याविषयीची मार्गदर्शनपर माहिती नाणकशास्त्रातील तज्ज्ञांकडून जाणून घेता येणार आहे.

पुणेकरांचे आकर्षण : यंदाच्या वर्षी विशेष बाब म्हणजे भारत सरकार टकसाल यांनी देखील या प्रदर्शनात स्टॉल लावले आहेत. त्यांच्याजवळ लहान मुलांसाठी तयार करण्यात आलेली नाणी तसेच 75 रू,150 रू,250 रू,आणि 400 रू ची नवीन नाणे असून ते पुणेकरांसाठी आकर्षण ठरत आहे. दुर्मिळ नाणी नोटा तसेच देश-विदेशातील नोटा तब्बल अडीचशे देशांमधील नोटा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पुणेकर नागरिकांनी गर्दी केलेली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.