ETV Bharat / state

Internal Dispute In Congress : काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; पश्चिम महाराष्ट्राच्या बैठकीत आमदारच गैरहजर - काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर

Internal Dispute In Congress : पुण्यातील काँग्रेस भवन येथे पश्चिम महाराष्ट्र (West Maharashtra) विभागातील जिल्हानिहाय आढावा बैठक (District wise review meeting of Congress) काल (शनिवारी) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष (Congress State President) नाना पटोले (Nana Patole) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. (MLA absent from Congress meeting) या बैठकीला पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित जरी असले तरी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी ही चव्हाट्यावर आली आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या बैठकीत आमदारच गैरहजर आढळून आले.

Internal Dispute In Congress
कॉंग्रेसचा झेंडा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 8, 2023, 6:19 PM IST

Updated : Oct 8, 2023, 6:36 PM IST

जिल्हा आढावा बैठकीत आमदारांच्या अनुपस्थितीबाबत बोलताना नाना पटोले

पुणे : Internal Dispute In Congress : कालच्या बैठकीत यामध्ये माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील मुरूमकर, आमदार प्रणिती शिंदे, आमदार डॉ. विश्वजीत कदम यांचीही उपस्थिती होती. कसबा मतदार संघाचे आमदार हे अनुपस्थित असल्याचे आढळून आले. त्यांच्या न आल्याने शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि त्यांच्यातील गटबाजी ही वरिष्ठांच्या समोर आली आहे. अशातच पुणे शहर काँग्रेसकडून आजच्या पश्चिम महाराष्ट्र विभागातील जिल्हानिहाय आढावा बैठकीसाठी जे फ्लेक्स बनविण्यात आला आहे, त्यात देखील आमदार रवींद्र धंगेकर यांचे फोटो वापरण्यात आलेले नाहीत. याबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारलं असता ते म्हणाले की, याबाबत मला माहिती नाही की आमदार रविंद्र धंगेकर हे का आले नाही. मी माहिती घेऊन सांगतो.

Internal Dispute In Congress
कॉंग्रेसच्या बैठकीत आमदारांच्या रिकाम्या खुर्च्या

पटोले आणि थोरातांमध्ये मतभेद : काँग्रेसच्या महाराष्ट्र युनिटमध्ये सर्व काही सुरळीत चाललेले नाही. नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील मतभेदांमुळे संतप्त झालेल्या पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केरळचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांच्याकडे प्रकरणाचा तपास सोपवत अहवाल मागितला होता. महाराष्ट्र युनिटमधील भांडणामुळे संतप्त झालेले काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी केरळचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांना राज्यातील समस्यांवर त्वरित अहवाल सादर करण्यासाठी विशेष दूत म्हणून नियुक्त केले. काँग्रेसचे संघटना प्रभारी केसी वेणुगोपाल यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, एमएलसी निवडणुकीवरून महाराष्ट्र युनिटचे प्रमुख नाना पटोले आणि जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यात झालेल्या मतभेदांमुळे खरगे नाराज होते.

काँग्रेसला राज्यात फटका बसतोय : काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात थेट 'एमएलसी' निवडणुकीवर लक्ष ठेवून होते. त्यानंतर सोनिया गांधी यांनी ज्येष्ठ नेते मोहन प्रकाश यांना या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्यासाठी पाठवले होते. पक्षाच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितले की, अहवाल सादर केला गेला, परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. राज्यात राहुल गांधींच्या 'भारत जोडो' यात्रेला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादानंतर महाराष्ट्रात काँग्रेस पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत असताना हा काँग्रेसला बसलेला मोठा धक्का होता.

हेही वाचा:

  1. Thackeray vs Shinde : ठाकरे गटाला झटका; आतापर्यंत 36 माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र'
  2. Ambadas Danve Criticized Kesarkar : हे सरकार कमिशनखोरांचं, दीपक केसरकर यांनी हाताखालचे काय करतात ते पाहावं - अंबादास दानवे
  3. Nana Patole News: मंत्रालयात दलालांचा मुक्त वावर पण सामान्य जनतेवर निर्बंध - नाना पटोले

Last Updated : Oct 8, 2023, 6:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.