पुणे : भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपासूनच तीन वैचारिक प्रमुख मुद्दे होते. त्यातील पहिला मुद्दा म्हणजे काश्मीर येथे कलम 370 हटविणे, तसेच दुसरा प्रमुख मुद्दा आयोध्येमध्ये राम मंदिर बनविणे आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे समान नागरी कायदा आहे. तिन्ही वैचारिक मुद्द्यांपैकी दोन मुद्दे हे पूर्ण झाले आहेत. आता तिसऱ्या समान नागरी कायद्यासाठी लॉ कमिशन तयार करण्यात आले असून देशातील जनतेची मते मागवली जात आहेत, अशी माहिती उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी दिली.
मौर्य यांची पत्रकार परिषद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्यावतीने उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी मौर्य देशातील महागाईबाबत म्हणाले की, देशात महागाई वाढली आहे, हे आम्ही मान्य करतो. पण 80 करोड लोकांना गेल्या साडेतीन वर्षापासून मोफत रेशन दिले जाते आहे. जगातील इतर देशांची तुलना केली असता आजही महागाईच्या या काळातही देशाची परिस्थिती नियंत्रणात ठेवून पुढे जात आहे, असे यावेळी मौर्य म्हणाले.
भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळणार : लोकसभेच्या निवडणुकीबाबत मौर्य म्हणाले की, 2024 साली होणाऱ्या निवडणुकीत पुन्हा एकदा देशात भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळणार आहे. तसेच महाराष्ट्रात देखील भाजपच्या 48 च्या 48 जागा निवडणूक आल्या तरी, आश्चर्य वाटू नये. तसेच उत्तर प्रदेशमध्ये देखील 75 च्या पुढे जागा जिंकू असे देखील यावेळी मौर्य म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत मौर्य म्हणाले की, मी देखील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पूजा करतो. पण आमच्याबरोबर धोका उद्धव ठाकरे यांनी केला. बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही काँग्रेसला स्वीकारले नाही. पण उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री बनण्याच्या स्वप्नात आमच्याशी धोका केला आहे. पण आज जनता आमच्या मागे आहे. महाराष्ट्रातही आम्हाला बहुमत मिळणार असल्याचे मौर्य म्हणाले.
हेही वाचा -
- BRS Maharashtra या कारणामुळे महाराष्ट्रातील माजी आमदार बीआरएसमध्ये घेत आहेत प्रवेश
- BRS office In Nagpur तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आज नागपुरात भारत राष्ट्र समितीच्या कार्यालयाचे होणार उद्घाटन
- Threat Case संजय राऊत यांना धमकी देणारा निघाला निकटवर्तीय मयूर शिंदे नावाच्या व्यक्तीला अटक कांजूरमार्ग पोलिसांची कारवाई