ETV Bharat / state

केंद्राच्या शेतकरी कायद्याचे पोस्टर फाडत एल्गार परिषदेचे उद्घाटन - एल्गार परिषदे उद्धाटन न्यूज

एल्गार परिषदेत रोहित वेमुलाचा भाऊ राजा वेमुला गुजरातमधील आयपीएस अधिकारी संजीव भट यांचे कुटुंबीय तसेच प्रशांत कनोजिया, लेखिका अरुंधती राय यांसारखे वक्ते उपस्थित राहणार आहेत. परिषदेचे आयोजक बी.जी.कोळसे पाटील देखील या परिषदेला संबोधित करणार आहेत.

केंद्रीय कायद्याचे पोस्टर फाडत एल्गार परिषदेचे उदघाटन

author img

By

Published : Jan 30, 2021, 1:16 PM IST

पुणे- गणेश कला क्रीडा मंचमध्ये एल्गार परिषदेला सुरुवात झाली असून केंद्र सरकारच्या शेतकरी, एनआरसी, युपीएए कायद्यांचे पोस्टर फाडून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. केंद्राचे हे कायदे काळे कायदे आहेत असा आरोप यावेळी करण्यात आला.

तीन वर्ष एल्गार परिषदेला परवानगी नाही

एल्गार परिषदेमध्ये देशभरातून विविध वक्ते सहभागी होणार आहेत. परिषदेदरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. ३१ डिसेंबर २०१७ ला पहिली एल्गार परिषद पुण्यातल्या शनिवार वाडा येथे आयोजित करण्यात आली होती. कोरेगाव-भीमा येथील शौर्य दिनाला २०० वर्षे पूर्ण होत असल्याने ही परिषद त्यावेळेस भरवण्यात आली होती. मात्र, त्यानंतर एक जानेवारी २०१८ ला कोरेगाव भीमा येथे हिंसाचार झाला होता नगर परिषदेत झालेल्या भडकाऊ भाषणामुळेच हा सर्व हिंसाचार घडल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी एल्गार परिषदेतील वक्त्यावर कारवाई केली होती. यानंतर गेली तीन वर्ष नगरपरिषदेला परवानगी देण्यात आलेली नव्हती.

रसत्यावर परिषद घेण्याचा इशारा-

माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी पुन्हा एकदा ३१ डिसेंबर २०२० ला ही परिषद भरण्याची परवानगी पोलिसांकडे मागितली होती. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यानंतर पुन्हा एकदा आयोजकांकडून ३० जानेवारीला एल्गार परिषद भरवण्यासाठी परवानगी मागण्यात आली आणि परवानगी मिळाली नाही तर रस्त्यावर परिषद घेऊ, असा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी ३० जानेवारीला एल्गार परिषद घेण्यासाठी परवानगी दिली.

या परिषदेत रोहित वेमुलाचा भाऊ राजा वेमुला गुजरातमधील आयपीएस अधिकारी संजीव भट यांचे कुटुंबीय तसेच प्रशांत कनोजिया, लेखिका अरुंधती राय यांसारखे वक्ते उपस्थित राहणार आहेत. परिषदेचे आयोजक बी.जी.कोळसे पाटील देखील या परिषदेला संबोधित करणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.