ETV Bharat / state

कोण राखणार किल्ले 'शिवनेरी'च्या जुन्नर विधानसभेचा गड; चौरंगी लढतीची शक्यता - Pune Junnar contituency ETV

२०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर शरद सोनवणे यांनी मनसेतून शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेनेतून तिसऱ्यांदा इच्छुक असलेल्या आशा बुचके नाराज झाल्या. त्यांच्यावर लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत पक्षाने हकालपट्टी केली. निष्ठावंत शिवसैनिक असलेल्या बुचके यांना शरद सोनवणे यांच्यामुळे २००९ व २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. या पराभवाची परतफेड करण्यासाठी अपक्ष उमेदवार राहून निवडणूक लढवण्याची तयारीही बुचके यांनी केली आहे.

कोण राखणार किल्ले 'शिवनेरी'च्या जुन्नर विधानसभेचा गड; चौरंगी लढतीची शक्यता
author img

By

Published : Sep 21, 2019, 3:49 PM IST

Updated : Sep 22, 2019, 4:48 PM IST

पुणे - राज्यातील सर्वाधिक किल्ले, सर्वाधिक धरणे, हायटेक शेती, तमाशापंढरी, विज्ञानपंढरी आणि राज्यातील एकमेव पर्यटन तालुका अशा विविध विशेषणांचे बिरुद घेऊन मिरवणारा या जुन्नर तालुक्याची ओळख आहे. सर्व क्षेत्रात आघाडी असलेला राज्यातील शिवनेरीच्या जुन्नर तालुक्याची एक वेगळी ओळख आहे. पाहुयात याच संदर्भातला हा खास ईटीव्ही भारतचा हा रिपोर्ट....

जुन्नर विधानसभेचा आढावा

हेही वाचा - मूर्तिजापूर मतदारसंघ: भाजपचे आमदार पिंपळे हॅट्रिकच्या तयारीत; विरोधकांचे कडवे आव्हान

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत प्रमुख पक्षांना डावलत येथील जनतेने मनसेच्या तिकिटावर उभ्या असलेल्या शरद सोनवणे यांना निवडून दिले होते. मनसेचे एकमेव आमदार राहिलेल्या सोनवणे यांनी सत्तेत नसतानाही भाजप-शिवसेना सरकारकडून शिवनेरीचा शिलेदार अशी ओळख निर्माण करत जुन्नरसाठी कोट्यवधींची विकासकामे केली, असे त्यांनी सांगितले आहे..

हेही वाचा - काँग्रेसच्या पहिल्या यादीचा कार्यक्रम पुढे ढकलला; त्यानंतरच होणार नावे जाहीर

२०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर शरद सोनवणे यांनी मनसेतून शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेनेतून तिसऱ्यांदा इच्छुक असलेल्या आशा बुचके नाराज झाल्या. त्यांच्यावर लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत पक्षाने हकालपट्टी केली. निष्ठावंत शिवसैनिक असलेल्या बुचके यांना शरद सोनवणे यांच्यामुळे २००९ व २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. या पराभवाची परतफेड करण्यासाठी अपक्ष उमेदवार राहून निवडणूक लढवण्याची तयारीही बुचके यांनी केली आहे.

हेही वाचा - रावेर मतदारसंघ : आजी-माजी आमदारांमध्येच रंगणार लढत, काँग्रेस मारणार काय मुसंडी?

2004 ते 2014 पर्यंत सलग दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या माजी आमदार वल्लभ बेनके यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळचे उपाध्यक्षपद भूषवत जुन्नर तालुक्यातील जनतेचे लालदिव्याचे स्वप्न पूर्ण केले. तालुक्यातील अनेक धार्मिक, ऐतिहासिक, सिंचन, शिक्षण क्षेत्रात त्यांची विकास दृष्टी आणि वचकही होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरी या राज्यातील एकमेव किल्याच्या विकासासाठी 100 कोटीचा निधी मिळवणारे ते पहिले आमदार ठरले. मात्र, प्रकृती अस्वस्थतेमुळे 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे तिकीट त्यांचे चिरंजीव महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अतुल बेनके यांना युवा चेहरा म्हणून मिळाले. मोदी लाट आणि पक्षांतर्गत गटबाजीमुळे अतुल बेनके यांना यावेळी पराभवाला सामोरे जावे लागले. असे असतानाही या वेळी पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी बेनके तयारीत आहेत.

हेही वाचा - 10 कार्यक्रम, पुरस्कार अन् बहुपक्षीय चर्चा; पंतप्रधान मोदी अमेरीका दौऱ्यासाठी रवाना

तर दुसरीकडे काँग्रेसनेही पुणे जिल्ह्यातील सासवड, भोर आणि जुन्नर या मतदार संघाची मागणी केली असल्याने विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन असलेल्या सत्यशील शेरकरही या ठिकाणावरून काँग्रेसच्या वतीने इच्छुक उमेदवार आहेत.

हेही वाचा - पुलवामासारखा प्रकार यावेळी घडला नाही, तर सत्ताबदल झाल्याशिवाय राहणार नाही - पवार

नुकत्याच झालेल्या 2019 च्या शिरूर लोकसभा निवडणूकीत शिवसेना-भाजप युतीचे तीन वेळा खासदार राहिलेल्या शिवाजी आढळराव पाटील यांचा जुन्नरचे भूमिपुत्र आणि नारायणगावचे रहिवाशी असलेल्या राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे यांनी 58 हजार 483 मतांनी पराभव केला होता. आढळराव पाटील यांना जुन्नर विधानसभेमधून 71,631 तर डॉ अमोल कोल्हे यांना 1,13,182 मते मिळाली. यात जुन्नरने ४१,५५१ मतांची आघाडी डॉ. कोल्हे यांना दिली. मात्र, या तालुक्यांतुन पाण्याची मोठी समस्या निर्माण होत आहे. भातशेती सारखे मुख्य पिक घेणारा आदिवासी बांधव अनेक समस्यांनी त्रस्त आहे. त्यातुन या तालुक्यात पर्यटनाचे मोठे जाळे असताना रोजगार मिळत नाही, या सगळ्या गोष्टींचा विचार करता जुन्नरची जनता कोणाच्या मागे राहणार यामध्ये आजही संभ्रमच आहे

जुन्नर मतदार संघ विस्तृत आहे. या मतदार संघाच्या पश्चिमेकडील भाग हा डोंगराळ असल्याने हिरडा आणि भट उत्पादन येथील मुख्य पिके आहे. या भागात आदिवासी समाज जास्त आहे. पर्यटकांना साद घालणारा पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा सातवाहन काळातील राजमार्ग नाणेघाट, दाऱ्याघाट, माळशेज परिसरातील निसर्ग सौन्दर्य, सोबतीला तालुक्यातील सात किल्यांची आणि ५ धरणांची शृंखला, हायटेक शेती, ऊसशेतीमुळे वाढलेला बिबट मानव संघर्ष आणि यासाठी बिबटयांची काळजी घेणारे माणिकडोह येथील राज्यातील एकमेव बिबट निवारा केंद्र, तुकाराम महाराजांचे गुरु बाबाजी चैतन्य यांची ओतूर येथील समाधीस्थळ, आळे येथील रेडा समाधी, अष्टविनायक गणपती पैकी ओझर, लेण्याद्री गणपती, तमाशापंढरी अशी ओळख असलेले नारायणगाव आणि विज्ञान पंढरी म्हणून ओळखले जाणारी आशिया खंडातील सर्वात मोठी खोडद रेडिओ दुर्बीण प्रकल्प, अशी ऐतिहासिक, धार्मिक, कृषी आणि विज्ञान क्षेत्रात असलेली या मतदार संघाची ओळख आहे.

हेही वाचा - MAHA VIDHAN SABHA : द्विभाषिक राज्याची पहिली निवडणूक आणि महाराष्ट्राचा ‘मंगल कलश’

यापुर्वीच्या सर्व निवडणूका पाहिल्या तर त्या निवडणुकांपेक्षा यावेळची विधानसभा निवडणूक ही अधिक चुरशीची होणार आहे. मनसेतून शिवसेनेत आलेले शरद सोनवणे सेनेचे उमेदवार आहेत. शिवसेनेतून हकालपट्टी केलेल्या आशा बुचके अपक्ष राहून सोनवणेचा बदला घेणार कि राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल बेनके, काँग्रेसचे सत्यशील शेरकर जुन्नरचे आमदार होणार यासह आमदार होण्याचा राजयोग नेमका कुणाच्या नशिबात असणार हे मात्र जनताच ठरवणार आहे.

Intro:Anc__राज्यातील सर्वाधिक किल्ले,सर्वाधिक धरणं,हायटेक शेती,तमाशापंढरी, विज्ञानपंढरी आणि राज्यातील एकमेव पर्यटन तालुका अशा विविध विशेषणांचं बिरुद घेऊन मिरवणारा हा सर्व क्षेत्रात आघाडी असलेला राज्यातला एकमेव तालुका किल्ले शिवनेरीच्या जुन्नर तालुक्याची एक वेगळी ओळख आहे चला पहावुयात जुन्नर तालुक्यात काय खलबत शिजतय...

Vo__ २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत प्रमुख पक्षांना डावलत इथल्या जनतेने मनसेच्या तिकिटावर उभ्या असलेल्या शरद सोनवणे यांना निवडून दिलं.मनसेचे एकमेव आमदार राहिलेल्या सोनवणे यांनी सत्तेत नसतानाही भाजप-शिवसेना सरकारकडून शिवनेरीचा शिलेदार अशी ओळख निर्माण करत जुन्नरसाठी कोटयावधींची विकासकामे केली

Byte - शरद सोनवणे,विध्यमान आमदार जुन्नर

Vo_२०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर शरद सोनवणे यांनी मनसेतून शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेनेतून तिसऱ्यांदा इच्छुक असलेल्या आशा बुचके नाराज झाल्या.त्यांच्यावर लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत पक्षाने हकालपट्टी केली.निष्ठावंत शिवसैनिक असलेल्या बुचके यांना शरद सोनवणे यांच्यामुळे २००९ व २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत पत्करावा लागला होता.या पराभवाची परतफेड करण्यासाठी अपक्ष उमेदवार राहून निवडणूक लढवण्याची तयारीहि बुचके यांनी केली आहे.

Byte_आशा बुचके, जिल्हा परिषद सदस्य

Vo_ 2004 ते 2014 पर्यंत सलग दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या माजी आमदार वल्लभ बेनके यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळचे उपाध्यक्ष हे पद भूषवत जुन्नर तालुक्यातील जनतेचे लालदिव्याचे स्वप्न पूर्ण केले.तालुक्यातील अनेक धार्मिक,ऐतिहासिक ,सिंचन,शिक्षण क्षेत्रात त्यांची विकास दृष्टी आणि वचकहि होता.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरी या राज्यातील एकमेव किल्याच्या विकासासाठी 100 कोटीचा निधी मिळवणारे ते पहिले आमदार ठरले.
परंतु प्रकृती अस्वस्थतेमुळे 2014 च्या
निवडणुकीत राष्ट्रवादीचे तिकीट त्यांचे चिरंजीव महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अतुल बेनके यांना युवा चेहरा म्हणून मिळाले.मोदी लाट आणि पक्षांतर्गत गटबाजीमुळे अतुल बेनके यांना यावेळी पराभवाला सामोरे जावे लागले.असं असतानाही या वेळी पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी बेनके तयारीत आहेत.

Byte-अतुल बेनके, युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस

Vo__ तर दुसरीकडे काँग्रेसनेही पुणे जिल्ह्यातील सासवड,भोर आणि जुन्नर या मतदार संघाची मागणी केली असल्याने विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन असलेल्या सत्यशील शेरकरहि या ठिकाणावरून काँग्रेसच्या वतीने इच्छुक उमेदवार आहेत.

Byte-सत्यशील शेरकर,इच्छुक काँग्रेस उमेदवार

Vo_नुकत्याच झालेल्या 2019 च्या शिरूर लोकसभा निवडणूकीत शिवसेना-भाजप युतीचे तीन वेळा खासदार राहिलेल्या शिवाजी आढळराव पाटील यांचा जुन्नरचे भूमिपुत्र आणि नारायणगावचे रहिवाशी असलेल्या राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे यांनी 58 हजार 483 मतांनी पराभव केला होता.आढळराव पाटील यांना जुन्नर विधानसभेमधून 71,631 मते तर डॉ अमोल कोल्हे यांना 1,13,182 मते मिळाली. यात जुन्नरने ४१,५५१ मतांची आघाडी डॉ कोल्हे यांना दिली. मात्र या तालुक्यांतुन पाण्याची मोठी समस्या निर्माण होत आहे व भातशेती सारखे मुख्य पिक घेणारा आदिवासी बांधव अनेक समस्यांनी त्रस्त आहे त्यातुन या तालुक्यात पर्यटनांचे मोठं जाळं असताना रोजगार मिळत नाही या सगळ्या गोष्टींचा विचार करता जुन्नरची जनता कोणाच्या मागे राहणार यामध्ये आजही संभ्रमच आहे

चौपाल__नागरिक,शेतकरी ,विश्लेषक

vo__ जुन्नर मतदार संघ विस्तृत असून या मतदार संघाच्या पश्चिमेकडील भाग हा डोंगराळ असल्याने हिरडा आणि भट उत्पादन हि हिथली मुख्य पिकं.या भागात आदिवासी समाज जास्त आहे. पर्यटकांना साद घालणारा पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा सातवाहन काळातील राजमार्ग नाणेघाट,दाऱ्याघाट,माळशेज परिसरातील निसर्ग सौन्दर्य,सोबतीला तालुक्यातील सात किल्यांची आणि ५ धरणांची शृंखला,हायटेक शेती, ऊसशेतीमुळे वाढलेला बिबट मानव संघर्ष आणि यासाठी बिबटयांची काळजी घेणारं माणिकडोह येथील राज्यातील एकमेव बिबट निवारा केंद्र, तुकाराम महाराजांचे गुरु बाबाजी चैतन्य यांची ओतूर येथील समाधीस्थळ,आळे येथील रेडा समाधी,अष्टविनायक गणपती पैकी ओझर,लेण्याद्री गणपती,तमाशापंढरी अशी ओळख असलेले नारायणगाव आणि विज्ञान पंढरी म्हणून ओळखले जाणारी आशिया खंडातील सर्वात मोठी खोडद रेडिओ दुर्बीण प्रकल्प.अशी ऐतिहासिक,धार्मीक,कृषी आणि विज्ञान क्षेत्रात असलेली या मतदार संघाची ओळख.राज्यात देशात आणि जगात स्वतःची वेगळी ओळख असलेल्या या मतदार संघातही मोठ्या समस्याच आहेत.

P2C__रोहिदास गाडगे__प्रतिनिधी

End Vo...या पुर्वी च्या सर्व निवडणूका पाहील्या तर त्या निवडणूकां पेक्षा या वेळची विधानसभा निवडणूक हि अधिक चुरशीची होणार आहे.मनसेतून शिवसेनेत आलेले शरद सोनवणे सेनेचे उमेदवार आहेत. शिवसेनेतून हकालपट्टी केलेल्या आशा बुचके अपक्ष राहून सोनवणेचा बदला घेणार कि राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल बेनके,काँग्रेसचे सत्यशील शेरकर जुन्नरचे आमदार होणार यासह आमदार होण्याचा राजयोग नेमका कुणाच्या नशिबात असणार हे मात्र जनताच ठरवणार आहे.
Body:Spl pkg..

Feed ftp :- mh_pun_1_junnar vidhansabha_spl pkg_mh10013

Total file :- 24Conclusion:
Last Updated : Sep 22, 2019, 4:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.