ETV Bharat / state

Holiday Package Fraud: 'हॉलिडे पॅकेज'च्या नावाखाली हुश्शार पुणेकरांना कोट्यवधी रुपयांचा चुना; कंपनीकडून 'नो रिस्पॉन्स'

author img

By

Published : May 1, 2023, 4:21 PM IST

पुणे शहरात विविध 'मॉल', 'डी-मार्ट' आणि पेट्रोल पंपावर हातात कूपन घेऊन काही तरुण-तरुणी उभे असतात. येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना हे कूपन भरायला देऊन आपल्याला गिफ्ट लागेल, असे ते सांगतात. काही नागरिकांनी कूपन भरल्यानंतर त्यांना एका कंपनीकडून गिफ्ट लागल्याचा फोन आला; मात्र कंपनीच्या कार्यालयात गेल्यावर त्यांची 'हॉलिडे पॅकेज'च्या नावाआड कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार घडला. याविरुद्ध पोलीस ठाण्यात पीडित नागरिकांकडून फसवणुकीच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

Holiday Package Fraud
पीडित नागरिक
'हॉलिडे पॅकेज'च्या फसवणुकीवर पीडितांची प्रतिक्रिया

पुणे: 'जेनियल इन्फो सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीच्या माध्यमातून पुणे शहरातील विविध ठिकाणच्या नागरिकांकडून कूपनवर नाव नंबर घेण्यात आले. त्यानंतर तुम्हाला गिफ्ट लागले आहे, असे सांगून या नागरिकांना कंपनीच्या कार्यालयात बोलावले गेले. तिथे त्यांना एक छोटेस गिफ्ट देखील देण्यात आले. तसेच कंपनीतर्फे आयोजित 'हॉलिडे पॅकेज'ला जायचे असेल तर 45 दिवसांच्या आधीच बुकिंग करा, असे सांगितले गेले. त्यानुसार काही नागरिकांनी बुकिंगही केले; मात्र पुढे कंपनीकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. जवळपास 40 हून अधिक नागरिकांची या कंपनीने फसवणूक केली असून ही रक्कम कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे.

'या' नागरिकांनाही चुना: 'जेनियल लिमिटेड' या कंपनीच्या पुण्यातील संचालकांवर या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार महिलेला 'जेनियल लिमिटेड' कंपनीने 'हॉलिडे पॅकेज' देण्याचे आमिष दाखवून 2 लाख 36 हजार रुपयांनी गंडविले. काही असाच प्रकार 'डी-मार्ट'मध्ये खरेदी करायला गेलेल्या व्यक्तीसोबत घडला आहे. 'जेनियल लिमिटेड' कंपनीने त्याला सपत्नीक कंपनीच्या कार्यालयात बोलावले आणि क्रेडिट कार्ड वरून अडीच लाख रुपयांचे 'हॉलिडे पॅकेज' घेण्यास भाग पाडले; मात्र त्या व्यक्तीलाही बुकिंगनंतर कंपनीकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नसल्याचे त्याने सांगितले.

शिवसेनेचा इशारा: फसवणूक झालेल्या नागरिकांनी याबाबत शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांची भेट घेऊन त्यांना माहिती दिली. त्यांनी अशा बेकायदेशीररित्या चाललेल्या या कंपनीने नागरिकांचे पैसे परत केले नाही तर त्यांचे कार्यालय फोडू आणि शहारत अशा लोकांना थांबणे देखील बंद करू, असा इशारा दिला आहे.

अशी घ्या खबरदारी: मॉलमध्ये खरेदीला गेल्यानंतर तेथे काही व्यक्तींकडून एका कार्डवर वैयक्तिक माहिती भरून घेतली जाते. त्यामध्ये तुमचे नाव, पत्ता, मोबाइल नंबर, उत्पन्न, कौटुंबिक माहिती घेतली जाते. त्यानंतर संपर्क करून विविध प्रलोभने दाखविली जातात. त्यामुळे अशा प्रकारे कोणत्याही कार्डवर स्वत:ची माहिती लिहून देऊ नये. तसेच अनोळखी कंपनीशी आर्थिक व्यवहार करताना कंपनीची सर्व माहिती पडताळून पाहावी. आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी त्या कंपनीची माहिती संबंधित सेवा पुरविणाऱ्या शासकीय वेबसाइटवर पडताळून पाहावी. त्याचप्रमाणे संबंधित सेवा पुरविणाऱ्या अन्य कंपन्यांशी पैशांबाबत चाचपणी करावी.

हेही वाचा: Sanjay Shirsat On Ajit Pawar: अजित पवार लवकरच निर्णय घेणार- शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.