ETV Bharat / state

पुण्यात आणखी दोन जण कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णांची संख्या पाचवर

कोरोनाबाधीत पुण्याच्या दाम्पत्याची मुलगी आणि त्यांना घेऊन येणारा वाहनचालक या दोघांची तपासणी करण्यात आली असून त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

corona virus
पुण्यात आणखी दोन जण कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णांची संख्या 5 वर
author img

By

Published : Mar 10, 2020, 7:33 PM IST

Updated : Mar 10, 2020, 8:11 PM IST

पुणे - दुबई येथून परत आलेल्या दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न आले होते. त्यानंतर खबरदारी म्हणून या रुग्णाची मुलगी आणि त्यांना घेऊन येणारा वाहनचालक या दोघांची तपासणी करण्यात आली असून, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाचे एकूण 5 रुग्ण झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे.

पुण्यात आणखी दोन जण कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णांची संख्या पाचवर

हेही वाचा - कोरोनाग्रस्त दाम्पत्याला भेटलेल्या लोकांची तपासणी सुरू - राजेश टोपे

दरम्यान, पुण्यात सोमवारी कोरोनाचे दोन रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने सर्व विभागाच्या बैठका घेत खबरदारी बाळगण्याच्या सूचना दिल्या होत्या. कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची ओळख पटविण्यासाठी पुण्यात पाच टीम तयार करण्यात आल्या आहेत. या टीममध्ये आरोग्य, पोलीस आणि महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

पुण्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यासाठी २०७ खाटा तयार ठेवण्यात आल्या आहेत. जे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत त्यांची नावे, राहण्याचे ठिकाण, जिथे काम करतात ती ठिकाणे उघड करू नयेत. त्याची माहिती देवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा - दुबईहून पुण्यात परतलेल्या दांपत्याला कोरोनाची लागण, देशभरात एकूण 47 रुग्ण

Last Updated : Mar 10, 2020, 8:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.