ETV Bharat / state

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुणे जिल्ह्यात मृत्यूचे तांडव, अवघ्या अडीच महिन्यांत 7 हजार जणांचा मृत्यू

राज्यातील काही भागांमध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र आहे. मात्र पहिल्या लाटेच्या तुलनेत राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अधिक मृत्यू झाले आहेत. पुणे जिल्ह्यात देखील अनेकांचा कोरोनाने बळी घेतला. जिल्ह्यातील कोरोना मृत्यूच्या आकडेवारीचा हा विशेष अहवाल.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुणे जिल्ह्यात मृत्यूचे तांडव

author img

By

Published : May 29, 2021, 5:55 PM IST

पुणे - राज्यातील काही भागांमध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र आहे. मात्र पहिल्या लाटेच्या तुलनेत राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अधिक मृत्यू झाले आहेत. पुणे जिल्ह्यात देखील अनेकांचा कोरोनाने बळी घेतला. जिल्ह्यातील कोरोना मृत्यूच्या आकडेवारीचा हा विशेष अहवाल.

पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 10 लाख 8 हजार 170 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत एकूण 16 हजार 702 जणांचा मृत्यू झाला आहे.

एक वर्षात 9 हजार 238 जणांचा मृत्यू

पुणे जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा विचार केला तर, गेल्या वर्षी 9 मार्च 2020 ला पुणे शहरात राज्यातील पहिला कोविड रुगण आढळून आला होता आणि त्यानंतर रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढतच गेली. गेल्या वर्षी जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा कहर पाहायला मिळाला. रुग्ण संख्या झपाट्याने वाढली तसे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणामध्ये देखील वाढ झाली. कोरोनाची ही पहिली लाट साधारण जानेवारी 2021 नंतर ओसरायला लागली होती, या वर्षीच्या 10 जानेवारीची आकडेवारी पाहिली तर या दिवशी पुणे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 3 लाख 68 हजार 98 इतकी होती. तर 8 हजार 798 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. हाच आकडा 10 फेब्रुवारी 2021 ला 3 लाख 90 हजार 515 वर पोहोचला, तर कोरोनाबाधितांच्या मृत्यूमध्ये वाढ होऊन मृत्यूची संख्या 9 हजार 031 एवढी झाली होती. 10 मार्चला जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा 4 लाख 22 हजार 989 वर पोहचला तर तोपर्यंत एकूण 9 हजार 238 जणांचा मृत्यू झाला होता. याचाच अर्थ राज्यातील पहिला कोरोना रुग्ण पुण्यात सापडल्यानंतर बरोबर एका वर्षानी म्हणजे 9 मार्च 2021 ला कोरोनाबाधितांची संख्या 4 लाख 22 हजार 989 इतकी झाली होती, तर कोरोनामुळे एकूण 9 हजार 238 नागरिकांचा मृत्यू झाला.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुणे जिल्ह्यात मृत्यूचे तांडव

अडीच महिन्यांत 7 हजार बळी

पुणे शहरात साधारणपणे मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शिरकाव केला. 10 मार्च ते 10 एप्रिल या दरम्यान पुणे जिल्ह्यात तब्बल 2 लाख नवे पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आणि याच काळात 1211 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 10 एप्रिल 2021 ला पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 6 लाख 26 हजार 152 वर पोहोचला होता, तर कोरोनामुळे तो पर्यंत एकूण 10 हजार 449 जणांचा मृत्यू झाला. नंतरच्या एक महिन्यात म्हणजे 10 मे रोजी पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीतांचा आकडा 9 लाख 33 हजारांवर पोहचला, तर कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या 14 हजार 550 वर पोहोचलली. कोरोनाच्या पहिल्या लाटेत म्हणजे गेल्या वर्षभरात कोरोनामुळे जिल्ह्यात 9 हजार 238 जणांचा बळी गेला, मात्र दुसऱ्या लाटेत केवळ अडीच महिन्यांतच कोरोनामुळे 7 हजार जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा - 'आपण नर्कात जगत असून आम्ही हतबल आहोत' - दिल्ली हायकोर्टानं व्यक्त केली नाराजी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.