ETV Bharat / state

पुणे कॉलेजेस इनोव्हेशन्समध्ये अव्वलस्थानी ; तब्बल तीन शिक्षण संस्था पाहिल्या १० मध्ये - सिंबोसिस महाविद्यालय

अटल रँकिंग ऑफ इन्स्टिट्युशन्स ऑन इनोव्हेशन आचिव्हमेंट ( Atal Ranking of Institutions on Innovation Achievement ) या स्पर्धेची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. या क्रमवारीत पुण्यातील तीन शिक्षण संस्थानी अंतिम 10 मध्ये स्थान पटकावले आहे. त्याचबरोबर तमिळनाडूतील इंडीयन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रास ( Indian Institute of Technology Madras ) या संस्थेने पहिला क्रमांक पटकावला आहे.

Atal Ranking of Institutions on Innovation Achievement
अटल रँकिंग ऑफ इन्स्टिट्युशन्स ऑन इनोव्हेशन आचिव्हमेंट
author img

By

Published : Jan 2, 2022, 1:52 PM IST

पुणे : पुणे हे शिक्षणाचं माहेर घर महणून ओळखलं जातं हे सर्वांना माहित आहे. आता हीच बाब पुन्हा एकदा सिध्द झाली आहे. कारण अटल रँकिंग ऑफ इन्स्टिट्युशन्स ऑन इनोव्हेशन आचिव्हमेंट ( Atal Ranking of Institutions on Innovation Achievement ) मध्ये पुण्यातील तीन शिक्षण संस्था या अव्वल स्थानी पोहोचल्या आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या ( Union Ministry of Education ) 'अटल' या राष्ट्रीय क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ( Savitribai Phule Pune University ) देशात आठवे स्थान मिळवले आहे. त्याचबरोबर राज्य पातळीवरील विद्यापीठात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पहिल्या स्थानावर आहे. तसेच पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालय, आणि सिंबोसिस महाविद्यालय हे देखील यादीत पहिल्या १० क्रमांकात आहेत.

देशातील शैक्षणिक संस्था व विद्यापीठांमध्ये 'नवोपक्रम व उद्योजकता विकास' होण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील 'ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन' तर्फे शिक्षणसंस्थांची नवोपक्रमातील उद्दीष्टपूर्ती या विषयक राष्ट्रीय क्रमवारी जाहीर केली जाते. २०२१ या वर्षात देशातील एक हजार ४३८ शिक्षणसंस्थानी या क्रमवारीत सहभाग घेतला होता. त्यामध्ये आयआयटी, एनआयटी आयआयएससी आदी संस्थांचाही समावेश आहे. केंद्रीय शिक्षण राज्य मंत्री डॉ. सुभाष सरकार यांनी बुधवारी ही क्रमवारी जाहीर केली आहे.
एआरआरआयचे हे तिसरे वर्ष आहे. यावर्षी या सपर्धेत देशभरातील १४३० उच्च शिक्षण संस्थांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत तमिळनाडूतील इंडीयन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रास ( Indian Institute of Technology Madras ) या संस्थेने पहिला क्रमांक पटकावला आहे.

विद्यापीठाने कॅम्पसवर व संलग्न महाविद्यालयात नवोपक्रम, स्टार्टअप संस्कृती रुजवण्यासाठीच ‘इनोव्हेशन सेल’ची स्थापना विद्यापीठात केली आहे. शिक्षण, उद्योग आणि सामाजिक प्रश्न यांच्या एकत्रीकरणातून नवोपक्रम आणि नवसंशोधन व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अटल क्रमवारीत मिळालेलं हे स्थान विद्यापीठाने केलेल्या कामाची पावती आहे. असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर म्हणाले.

हेही वाचा : VIDEO : Koregaon-Bhima शौर्य दिनानिमित्त चिमुकल्या धम्म विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष, जाणून घेतला इतिहास

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.