पिंपरी-चिंचवड (पुणे) -पिंपरी-चिंचवडमध्ये दुचाकी चोरणाऱ्या टोळीला भोसरी MIDC पोलिसांनी जेरबंद केले. टोळीकडून 16 लाखांच्या एकूण 24 दुचाकी आणि 4 वाहन हस्तगत केली आहेत. यामध्ये बुलेटसह इतर महागड्या दुचाकी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी आकाश केरनाथ बधे, विलास बाळशीराम मोरे, अक्षय अभिमान जाधव, ऋषिकेश शांताराम पिंगळे यांना अटक केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण हे त्यांच्या तपास पथकासह गस्त घालत होते. तेव्हा तपास पथकातील पोलीस कर्मचारी विजय दीपक दौंडकर यांना गोपनीय माहिती मिळाली की, पिंपरी-चिंचवड शहरात दुचाकी चोरणारे आरोपी हे भोसरी MIDC परिसरात येणार आहेत. त्यानुसार सापळा रचून आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींकडून 16 लाखांच्या 24 दुचाकी आणि 4 वाहन जप्त केली आहेत. तर एकूण 17 गुन्हे उघडकीस आणले आहेत. यातील आरोपी आकाश चे कम्प्युटर इंजिनिअर चे उच्चशिक्षण झालेले आहे. तसेच आरोपी विलास हा बी.ए शिक्षण घेतलेले आहे. अक्षय जाधव हा दहावी पास आहे.
पोलीसांची कारवाई
ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त सागर कवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे, गुन्हे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण, शरद गांधीले, विजय दौंडकर, अनिल जोशी, करण विश्वासे, रहीम शेख, नितीन खेसे, विशाल काळे यांनी केली आहे.
हेही वाचा -ठाण्यात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश.. दोन अभिनेत्रींसह पाच जणांना अटक