पुणे - दिवाळीचा सण म्हटलं की सर्वांसाठी एक आनंदाचे पर्व वर्षानुवर्ष अखंडपणे ही दिवाळी साजरा करण्याची परंपरा आहे. दिवाळीत सर्वांच्याच घरी फराळ केला जातो. त्याच पद्धतीने मिठाई आणि इतरही पदार्थ हे बाजारातून खरेदी केली जाते. फराळ किंवा मिठाई खाताना ती मिठाई किंवा फराळ जास्त खाल्यास त्याचा धोका हा आरोग्यास होऊ शकतो आणि त्यामुळे तब्यात बिघडूदेखील शकते. म्हणून दिवाळीत फराळ खाताना आपल्या आरोग्याची योग्य प्रकारे काळजी घेतली गेली पाहिजे आणि त्याच बरोबर व्यायाम देखील करणं तितकच गरजेचं आहे, असा सल्ला आएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत ईटीव्ही भारतने डॉ. भोंडवे यांच्याशी संवाद साधला. यावेळी ते ईटीव्ही भारतसोबत बोलत होते.
तर वजन वाढू शकते...
कोरोनाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याचे महत्त्व किती आहे हे कळलेलेच असताना दिव्यांच्या या महोत्सवात फराळ आणि मिठाई हा एक महत्त्वाचा भाग असतो. दिवाळीच्या सणा दरम्यान आपले संकोच बाजूला ठेवून लाडू, रसगुल्ला, काजुकतली, जिलेबी आणि इतर गोष्टींवर आपण ताव मारत असतो. मात्र, या पदार्थांवर ताव मारत असताना या उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात वजन वाढण्याची शक्यता असते. त्याच पद्धतीने शरीरातील साखरेचे प्रमाण वाढवून डायबेटीसच्या समस्या फॅटफूल पदार्थांमुळे शरीरावरची अतिरिक्त चरबी वाढणे अशा आजारांचा सामना करावा लागतो. दिवाळीच्या काळात लोकांच्या शरीरातील साखरेच्या पातळीत वाढ होते. सण उत्सवांच्या काळात 250 मिलीग्राम डीएलवरील लोकांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण 15 टक्क्यांनी वाढ होते. 300 मिलीग्राम डीएलच्यावर लोकांमध्ये 18 टक्के वाढ होते. त्यामुळे दिवाळीत फराळ खात असताना वजन वाढणार नाही, ना याची योग्य ती काळजी घेतली पाहिजे, असे यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितलं.
हेही वाचा - विशेष : दिवाळीत आरोग्याची काळजी कशी घ्याल?
योग्य असा व्यायाम केला पाहिजे -
लहान मुलांना रोजचे खेळ खेळणे सध्या होत नाही. धावणे पळणे उड्या मारणे सायकलिंग अशा गोष्टी लहान मूल करू शकतात. मुली सुर्यनमस्कार, दोरीवरच्या उड्या याप्रकारचा व्यायाम करू शकतात. मात्र, परंतु धावपळीच्या सणासुदीच्या या काळात हे होत नाही. मध्यमवयीन व्यक्तीने पायी चालले पाहिजे. दिवसाला 6 हजार पाऊले चालले पाहिजे. सुरुवात ही थोडी थोडी करायला हवी आणि त्यानंतर दिवसाला 6 हजार पाऊल हे चाललेच पाहिजे. ते ही पाऊण ते एक तासात. त्याचपद्धतीने जर धावण्याचा व्यायाम करत असाल तर 35 मिनिटे हे रोज या प्रकारचा व्यायाम व्हायलाच पाहिजे, अशापद्धतीने जर रोजच्या रोज व्यायाम होत असला आणि अधूनमधून दिवाळीचा फराळ जास्त खाल्ला गेला तर त्याचा परिणाम होत नाही, असेदेखील यावेळी डॉ. भोंडवे म्हणाले.
भेसळ पासून सावधान -
दिवाळीच्या सणाच्या काळात मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते. दिवाळी उत्सवात घरच्या घरी तयार केलेला फराळ कमीत कमी प्रमाणात खाण्यात यावा आणि मिठाई आदी प्रकारचे पदार्थ घेताना ते योग्य आणि प्रमाणयुक्त दुकाना मधूनच घेण्यात यावे. भेसळयुक्त मिठाईपासून शरीरास कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ शकत नाही याची काळजी दिवाळीत मोठ्या प्रमाणात घेणे आवश्यक आहे.