ETV Bharat / state

दौंड: भीमा नदीच्या पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटींवर कारवाई - अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटींवर कारवाई

दौंड पोलीस स्टेशन हद्दीत आलेगाव येथे भीमा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांना मिळाली. ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि महसूल विभागाने आलेगाव येथे छापा टाकला.

illegal sand levy
भीमा नदी पात्रात अवैध वाळू उपसा
author img

By

Published : Nov 27, 2019, 5:15 PM IST

पुणे - दौंड तालुक्यातील आलेगाव येथे अवैध वाळू उपसा करणाऱ्या पाच बोटी जिलेटीनच्या सहाय्याने फोडण्यात आल्या. बारामती गुन्हे शाखा, दौंड पोलीस आणि दौंड महसूल विभाग यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

भीमा नदीच्या पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटींवर कारवाई

दौंड पोलीस स्टेशन हद्दीत आलेगाव येथे भीमा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांना मिळाली. ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि महसूल विभागाने आलेगाव येथे छापा टाकला. या वेळी भीमा नदीच्या पात्रात अवैध वाळु उपसा करणाऱ्या पाच फायबर बोट आढळून आल्या. या बोटींमध्ये सुमारे वीस ब्रास वाळूही मिळाली. बोटी आणि वाळू असा अंदाजे 29 लाख रूपयांचा मुद्देमाल या पथकाने जप्त केला.

हेही वाचा - मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदतीचे वाटप
दौंड तहसील कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी वाळू उपसा करणाऱ्या बोटी जिलेटीनच्या सहाय्याने फोडल्या. या कारवार्ईमध्ये पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिप पाटील, बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना, दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक, बारामती क्राईम ब्रँच पथकाचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचा सहभाग होता.

Intro:Body:दौड येथे अवैधरित्या वाळू व्यवसाय वर पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, 29 लाखांचा माल जप्त...

दौंड

दौंड तालुक्यातील आलेगाव येथे वाळू उपसा करणाऱ्या पाच बोटी
आणि त्यातील वाळु असा मुद्देमाल पोलिसांना आढळून आला . यात सापडलेल्या ५ वाळू उपसा करणाऱ्या बोटी
जिलेटीन च्या साहयाने फोडण्यात आल्या आहेत . ही कारवाई बारामती क्राईम ब्रँच , दौंड पोलीस आणि दौंड महसूल विभागाचे कर्मचारी यांनी केली

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ,बारामती चे अप्पर पोलीस अधीक्षक, जयंत मीना यांना
गोपनीय माहिती मिळाली की, दौंड पोलीस स्टेशन हद्दीत आलेगाव गावातील भीमा नदीच्या पात्रातून वाळू उपश्याची कोणतीही परवानगी नसताना अवैध रित्या वाळू उपसा करून त्या वाळूची चोरी सुरु आहे.

ही माहिती मिळाल्यावर पोलीस आणि महसूल विभागाने अचानक छापा मारला असता , नदीच्या पात्रात अवैध वाळु उपसा करणाऱ्या पाच फायबर बोट आढळून आल्या . या बोटींमध्ये अंदाजे वीस ब्रास वाळू असा माल मिळाला . असा एकुण अंदाजे 29 लाख रूपयांचा माल या पथकाने जप्त केला .

यातील फायबर व वाळू उपसा करणाऱ्या बोटी जिलेटीनच्या सहाय्याने दौड तहसील ऑफिस मधील अधिकारी आणि कर्मचारी यांचे मदतीने यांनी फोडण्यात आल्या आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली

ही कामगिरी पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक संदिप पाटील ,बारामती चे अप्पर पोलीस अधीक्षक, जयंत मीना
यांचे मार्गदर्शनाखाली
दौंड चे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी , दौंड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक ,
बारामती क्राईम ब्रँच पथकाचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव ,
बारामती क्राईम ब्रँच चे पोलिस हवालदार संदिप जाधव, सुरेंद्र वाघ, पो.ना. स्वप्नील अहिवळे ,पो.कॉ. विशाल जावळे ,पो.कॉ. शर्मा तसेच दौंड पोलीस स्टेशन चे पोलीस हवालदार श्रीरंग शिंदे, धनंजय गाढवे, अमोल गवळी, आसिफ शेख .
तसेच भिगवण पोलीस स्टेशन चे
पोलीस उपनिरीक्षक रियाझ शेख, आणि पोलिस जवान अंकुश माने , यांनी केली .तसेच या कामासाठी दौड तहसील कार्यालयातील नितिन मक्तेदार-सर्कल, विजय खारतोड़े- सर्कल, अंबादास शिपकुले -कोतवाल यांची मदत घेण्यात आली.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.