ETV Bharat / state

साहेब, दादा काळजी करू नका, मी जबाबदारी पूर्ण करेन - पार्थ पवार - PUNE

भाजप शिवसेना सरकारने अत्यंत चुकीची कामे केली आहेत. बेरोजगारी, महागाई आणली आहे. फक्त स्वप्ने दाखवण्याचे काम या सरकारने केले आहे, अशी टीका त्यांनी केली.

पार्थ पवार
author img

By

Published : Mar 18, 2019, 9:35 AM IST

पुणे - महाराष्ट्राने पवार कुटुंबियांना भरभरुन प्रेम दिले आहे. असेच प्रेम द्या. मी नवीन आहे. पण, दादा आणि साहेब काळजी करू नका. विश्वास ठेवा मी माझी जबाबदारी पूर्ण करून दाखवेल, असा शब्द मावळचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी त्यांच्या वडील आणि आजोबांना दिला. पार्थ पवार यांच्या प्रचाराचा नारळ काल फोडण्यात आला त्यावेळी त्यांनी त्यांचे पहिले भाषण केले.

मावळचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचाराची सुरुवात करण्यात आली.

ते म्हणाले, की हे माझे पहिले भाषण आहे. काही चुका झाल्या तर मला माफ करा. या भाजप शिवसेना सरकारने अत्यंत चुकीची कामे केली आहेत. बेरोजगारी, महागाई आणली आहे. फक्त स्वप्ने दाखवण्याचे काम या सरकारने केले आहे, अशी टीका त्यांनी केली.

उमेदवारी दिल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आभार मानले. ते म्हणाले, की शरद पवार आणि अजित पवार यांनी बारामतीचा विकास केला. त्याचप्रमाणे, मी पिंपरी चिंचवड आणि मावळचा विकास करणार आहे. यावेळी पार्थ यांनी त्यांचे वडील अजित पवार आणि आजोबा शरद पवार यांना माझ्यावर विश्वास ठेवा असेही सांगितले.

यावेळी अजित पवार म्हणाले, की पोटाची खळगी भरण्यासाठी कामगार लोक या शहरात आले. हिंजवडीत नोकरीच्या निमित्ताने तरुण शहरात आले. कामगारांच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवडचा विकास करत असताना पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱयांनी खंबीर भूमिका घेतली. त्यामुळे विकास करात आला. यावेळी त्यांनी पार्थ पवार आणि अमोल कोल्हे यांना निवडून देण्याचे लोकांना आवाहन केले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, ज्येष्ठ नेते नाना काटे आदी उपस्थित होते.

Video attached in mail

Headline-दादा, साहेब काळजी करू नका, मी जबाबदारी पूर्ण करेन -पार्थ पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी दिली आहे. हे माझं पहिलं भाषण आहे. काही चुका झाल्या तर मला माफ करा. या भाजप, शिवसेना सरकारने अत्यंत चुकीची कामे केलीत. आजच्या सरकारने बेरोजगारी, महागाई, शेतकरी असंख्य समस्या आणल्या आहेत. हे सरकार फक्त डिजिटल आहे. या सरकारने फक्त स्वप्नं दाखवले. पक्षाने माझ्यावर उमेदवारी देऊन मोठी जबाबदारी दिली आहे. बारामतीचा विकास शरद पवार साहेब, अजितदादांनी केलायं. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवडसह मावळ लोकसभा मतदारसंघाचा विकास करणार आहे.  आज पूर्ण महाराष्ट्राने पवार कुटुंबियाला भरभरून प्रेम दिलं. तसंच प्रेम द्या. मी नवीन आहे. दादा, साहेब काळजी करू नका. विश्वास ठेवा, मी माझी जबाबदारी पूर्ण करून दाखवेन, असा विश्वास मावळ मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी व्यक्त केला.

चिंचवड येथील आहेर गार्डन येथे पार्थ पवार यांच्या प्रचाराचा नारळ शरद पवार यांच्या हस्ते आज चिंचवडमध्ये फोडण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शेकापचे अध्यक्ष जयंत पाटील, मावळचे उमेदवार पार्थ पवार, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, ज्येष्ठ नेते नाना काटे आदी उपस्थित होते.

यावेळी अजित पवार म्हणाले, पोटाची खळगी भरण्याची कामगार लोकं या शहरात आली. हिंजवडीत नोकरीच्या निमित्ताने तरुण शहरात आले. कामगारांच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवडचा विकास करत असताना पक्षाचे स्थानिक पदाधिका-यांनी खंबीर भूमिका घेतली. त्यामुळे मोठमोठे रस्ते झाले. विकास कामांचे पवार साहेबांनी भूमीपूजन केलं. दहा वर्ष पालकमंत्री असताना करोडो रुपयांचा पैसा शहरात आणला. यावेळी निवडणुकीत गाफील राहू नका. रात्री एक आणि दिवसा एक असे मॅच फिक्सिंग करू नका, एक दिलाने काम करा आणि अमोल कोल्हे व पार्थ पवार यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.