ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये जोरदार पाऊस; नागरिकांची तारांबळ - pimpri chinchwad rain news

पिंपरी-चिंचवडमध्ये आज दुपारी पावसाने अचानक हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून शहरात नागरिक उकाड्याने हैराण आहेत. मात्र, आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

pune rains
पिंपरी-चिंचवडमध्ये जोरदार पाऊस; नागरिकांची तारांबळ
author img

By

Published : Jun 24, 2020, 6:27 PM IST

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये आज दुपारी पावसाने अचानक हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून शहरात नागरिक उकाड्याने हैराण आहेत. मात्र, आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये जोरदार पाऊस; नागरिकांची तारांबळ
शहरात निसर्ग चक्रीवादळादरम्यान पाऊस झाला होता. त्यानंतर काही दिवस वातावरण ढगाळ राहिले. मात्र पाऊस पडत नव्हता. त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण होते. मात्र आज दुपारी अचानक ढग दाटून आले आणि पिंपरी-चिंचवड शहरातील काही भागांत पाऊस झाला. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. अर्धा तास कोसळेल्या मुसळधार पावसाने परिसरात गारवा निर्माण झाला आहे.

मान्सून सक्रिय झाल्यानंतर देखील शहरात पाऊस झालेला नाही. मावळ परिसरात शेतकऱ्यांनी भाताची लागवड केली असून मध्यमस्वरुपाचा पाऊस पडला आहे. त्यामुळे सध्या तरी शेतकरी सुखावलेला असून शहरावासीय मात्र आणखी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.