ETV Bharat / state

भीमाशंकर परिसरात पावसाचा जोर वाढला; उत्तर पुणे जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला - Shirur

सह्याद्री पर्वत रांगांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने कुकडी प्रकल्पातील नद्या आणि भीमा, भामा, इंद्रायणी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. काही ठिकाणी नद्यांचे पाणी पात्राबाहेर आले आहे.

भीमा नदी
author img

By

Published : Aug 4, 2019, 4:41 PM IST

पुणे- उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यात मागील 24 तासापासून पावसाचा जोर वाढला आहे. सह्याद्री पर्वत रांगांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने कुकडी प्रकल्पातील नद्या आणि भीमा, भामा, इंद्रायणी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. काही ठिकाणी नद्यांचे पाणी पात्राबाहेर आले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना धोका निर्माण झाला आहे.

भीमा नदी, राजगुरुनगर

राजगुरुनगर शहरालगत भीमा नदी काठावर क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म वाडा असून त्याच्याच बाजूला राम मंदिर, कार्तिक स्वामी मंदिर आहे. भीमा नदीला आलेल्या पुरामुळे राजगुरूंच्या जन्म वाड्याला पाणी लागले आहे. भीमेचे हे रौद्र रूप पाहण्यासाठी राजगुरुनगर शहरातील नागरिक गर्दी करत आहेत. मात्र, नदीकाठावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

कुकडी प्रकल्पातील नद्या व भीमा, भामा आणि इंद्रायणी या नद्यांचे पात्र दुथडी भरून वाहत आहेत. पावसाची संततधार अजूनही सुरू राहिली तर नदीपात्रात यापेक्षाही जास्त पाणी येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

Intro:Anc- उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड आंबेगाव जुन्नर शिरूर तालुक्यात मागील 24 तासापासून पावसाचा जोर वाढला आहे तर सह्याद्री पर्वत रांगांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने कुकडी प्रकल्पातील नद्या व भीमा, भामा, इंद्रायणी या नद्या दुथडी भरून वाहत असून काही ठिकाणी नद्यांनी पात्र सोडले आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना धोका निर्माण झाला आहे राजगुरुनगर शहरालगत भीमा नदी काठावर क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म वाडा असून त्याच्याच बाजूला राम मंदिर, कार्तिक स्वामी मंदिर आहे

भीमा नदीला आलेल्या पुरामुळे राजगुरूंच्या जन्म वाड्याला पाणी लागले आहे त्यामुळे काही प्रमाणात धोका निर्माण झाला असून भीमेचेबहे रौद्र रूप पाहण्यासाठी राजगुरुनगर शहरातील नागरिक गर्दी करत आहेत मात्र नदीकाठावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे

कुकडी प्रकल्पातील नद्या व भीमा भामा व इंद्रायणी या नद्यांचे पात्र दुथडी भरून वाहत असून पावसाचीही संततधार अजूनही सुरू राहिली तर नदीपात्रात यापेक्षाही जास्त पाणी येण्याची शक्यता नाकारता येणार नाही त्यामुळे नागरिकांनी सतर्क नही देने सतर्कतेने राहण्याच्या आव्हान प्रशासनाकडून करण्यात आले आहे

Body:...

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.