पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पिंपरीमध्ये अज्ञात ७ ते ८ जणांच्या टोळक्याने १८ वाहनांची तोडफोड केली आहे. ही घटना सोमवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. परिसरात दहशत माजविण्याच्या दुष्टीने हे कृत केल्याचे पोलिसांनी सांगितले असून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे कार्य सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत संजय गांधी नगर येथे अज्ञात सात ते आठ जणांच्या टोळक्याने वाहनांची तोडफोड केली. हातात लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्रे घेऊन दहशत पसरविण्याच्या उद्देशाने ही तोडफोड करण्यात आल्याचे पिंपरी पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेत दुचाकी, तीन चाकी आणि चार चाकीसह इतर वाहनांच्या काचा फोडून नुकसान करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती पिंपरी पोलिसांनी दिली.
हेही वाचा- बापरे ! गेल्या वर्षात पुणेकरांनी 27 लाख वेळा मोडले वाहतुकीचे नियम