चाकण(पुणे)-भामा-आसखेड धरणाजवळील थोपटेवाडी येथे 17 वर्षीय तरुणीच्या डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या झाली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा समोर आली आहे. तरुणीचा मृतदेह विवस्त्रावस्थेत आढळून आला. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
भामा आसखेड परिसरातील थोपटेवाडी येथे तरुणीचा मृतदेह आढळल्याने चाकण पोलीस रात्री उशिरा घटनास्थळी दाखल झाले. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी चाकण ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. हत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
तरुणीच्या नातेवाईकांनी तक्रारीत चार संशयितांची नावे नोंदवली आहेत. मात्र, रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नव्हती.चाकण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.
कोरोनाच्या महामारीचे संकट असताना खेड तालुक्यातील ग्रामीण भागात तरुणीची निघृण हत्या झाली आणि मृतदेह विवस्त्रावस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.ही हत्या का व कशासाठी करण्यात आली याचा तपास चाकण पोलीस करत आहेत.