ETV Bharat / state

Ganesh Visarjan २०२३ : गणेश विसर्जन सुरू असताना वीज कोसळल्यानं मिरवणुकीत गणेशभक्ताचा मृत्यू

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 28, 2023, 8:02 AM IST

Updated : Sep 28, 2023, 8:25 PM IST

20:23 September 28

गणेश विसर्जन सुरू असताना वीज कोसळल्यानं मिरवणुकीत गणेशभक्ताचा मृत्यू

मुंबईत सर्वत्र गणेश विसर्जन सुरू असताना मुंबईच्या जुहू समुद्रकिनाऱ्यावरून एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. जुहू समुद्रकिनाऱ्यावर विसर्जनासाठी तैनात असलेल्या एका स्वयंसेवकावर वीज पडल्याची दुर्घटना घडली होती. यानंतर त्या तरुणाला महापालिकेच्या कुपर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे कूपर रुग्णालयातील डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

19:10 September 28

शिर्डीतील क्रांती मंडळाच्या पांरपरिक गणेश मिरवणूक

शिर्डीतील क्रांती मंडळच्या वतीने आज बाप्पाला पालखीत बसून ढोल ताशांचा नागड्यात मिरवणूक कढलीय. शिर्डीतील क्रांती मंडळाचे हे 31 व वर्षा गणपति स्थापनेचे असून नेहमी प्रमाने या ही वर्षी भव्य पांरपरिक विसर्जन मिरवणूक काढण्यात आलीय. पालखीत गणपति बाप्पा अन्य पालखी गंरायच्या भक्तांच्या खांद्यावर आणि समोर गणेश भक्तांच्या हातात ढोल आणि डोक्यावर लाल फेटा तसेच एकाचा गणवेशात बाप्पाचे भक्त आतिशे सुंदर आणि शांतती पद्धतीने क्रांती मंडळाच्या वतीने गणपती बाप्पाची मिरवणूक काढण्यात आलीय.

17:06 September 28

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणरायाला दिला निरोप

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सागर या शासकीय निवासस्थानी घरगुती गणेशाचे विसर्जन केले. अत्यंत पारंपारिक आणि पर्यावरण पूरक पद्धतीने त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कृत्रिम तलावात गणेशाचे विसर्जन करून गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याचा गजर केला..

16:28 September 28

लालबागच्या राजाची शाही मिरवणूक, गुलालाची उधळण करत जयघोष

मुंबई : लालबागच्या राजाची विसर्जनाची शाही मिरवणूक मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडतात भव्य स्वागत लालबागच्या राजाचे करण्यात आले. फाटक्यांची आताषबाजी करत गुलालाची उधळण करत लालबागच्या राजाला मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर काढण्यात आले. त्याचवेळी रायगड किल्ल्याची प्रतिकृती असलेल्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर इंद्र जिमी जम्भ पर या गाण्याने शिवरायांचा जय जयकार करत लालबागच्या राजाचे जंगी स्वागत करण्यात आले.

15:50 September 28

सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक कलाकारांचे ढोलताशा पथकात वादन

पुणे : लाडक्या गणरायाला निरोप देण्याची वेळ आली असून पुण्यातील मानाच्या तसेच विविध गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक कलाकारांनी ढोलताशा पथकात वादन केले आहे.

14:22 September 28

पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी घेतला गणेश विसर्जन मिरवणुकीचा आनंद

पुणे : मानाच्या गणपती मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. मोठ्या संख्येनं नागरिक हे विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले आहेत. उत्साह हा पुण्याच्या या विसर्जन मिरवणुकीत पाहायला मिळत आहे. अश्यातच पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलीस बंदोबस्ताचा तणाव असताना देखील विसर्जन मिरवणुकीचा आनंद घेतला.

13:23 September 28

पुण्याचा मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

पुणे : मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. अतिशय भक्तिमय वातावरणात पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी मंडळकडून पारंपरिक पेहरावातील अश्वारुढ पहेरावामध्ये शंखनाद करणारे कार्यकर्ते हे मिरवणुकीचे आकर्षण आहे. त्यांच्या विसर्जन मिरवणुकीत सतीश आढाव यांचा नगारावादनाचा गाडा, समर्थ प्रतिष्ठान आणि ताल ढोल-ताशा पथकांचे वादन, चांदीच्या पालखीपुढे विष्णूनाद पथकाच्या वादकांचा शंखनाद आहे.

13:08 September 28

लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरू

मुंबई - लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे. लाखो भक्त या मिरवणुकीत सहभागी झाले आहे. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'च्या जयघोषानं परिसर दुमदुमला आहे.

12:44 September 28

लालबाग राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

मुंबई : Ganesh Visarjan 2023 : दहा दिवस चालणाऱ्या गणेश उत्सवाची सांगता आज म्हणजेच अनंत चतुर्दशीला होत आहे. लालबागच्या राजाची (Lalbaugcha Raja) विसर्जन मिरवणूक निघत असून, या विसर्जनाच्या मिरवणुकीपूर्वी उत्तर पूजा करूनआपल्या लाडक्या राजाला निरोप देताना आरती केली जाते. या आरतीत हजारो भाविक सामील होतात. या आरतीनंतर (Lalbaugcha Raja Ganpati Aarti) लालबागचा राजा गिरगाव चौपाटीच्या दिशेने रवाना झाला.

12:03 September 28

पुण्यातील मानाचा पहिला श्री कसबा गणपती विसर्जन मिरवणूक सुरू

पुणे : आज आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्याची वेळ आली आहे. पुण्यातील मानाच्या तसेच विविध गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या आहेत. सकाळी साडे दहा वाजता महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून विसर्जन मिरवणुकीची सुरुवात झाली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.पुण्यातील मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपती मंडळाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली.

11:46 September 28

मानाच्या तुकाराम माळी गणपतीच्या पूजनाने कोल्हापुरातील विसर्जन मिरवणुकीला झाली सुरुवात

कोल्हापूर : लाडक्या गणपती बाप्पाला कोल्हापूरकर आज निरोप देत आहेत, कोल्हापुरातील मानाच्या तुकाराम माळी गणपतीच्या पूजनाने यंदाच्या विसर्जन मिरवणुकीला सकाळी साडेनऊ वाजता मान्यवरांच्या उपस्थित सुरुवात झाली. कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने मिरवणूक मार्गावर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

10:40 September 28

मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक गिरगाव चौपाटीकडं मार्गस्थ; भाविकांचा लोटला जनसागर

मुंबई : Ganesh Visarjan 2023 : दहा दिवस चालणाऱ्या गणेश उत्सवाची सांगता आज म्हणजेच अनंत चतुर्दशीला होत आहे. आज बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन होणार आहे. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' जयघोषासह भाविकांनी गणरायाच्या (Mumbaicha Raja Visarjan 2023) नामाचा जयघोष केला. मुंबईतील गणपती विसर्जनाला सुरुवात झाली आहे. गणेश गल्लीतील मुंबईचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणरायाची विसर्जन (Ganpati immerssion 2023) मिरवणूक सकाळी साडेआठ वाजता गिरगाव चौपाटीच्या दिशेनं मार्गस्थ झाली आहे. ढोल- ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत आपल्या लाडक्या बाप्पाला, मुंबईच्या राजाला निरोप देण्यासाठी मुंबईतील भाविकांनी गर्दी केली आहे. आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी गणेशभक्तांनी मुंबईत गर्दी केली आहे.

10:23 September 28

गणेश विसर्जनापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांच्या 'वर्षा' शासकीय निवासस्थानी गणरायाची आरती

मुंबई - गणेश विसर्जनापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणरायाची आरती करण्यात आली. यावेळी ग्रामविकास आणि पर्यटन मंत्री गिरीश महाजन, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुनील तटकरे, सिने अभिनेते सचिन पिळगावकर, गायिका वैशाली सामंत त्यांच्यासह अनेक राजकीय नेते आणि कलावंत उपस्थित होते.

10:02 September 28

राष्ट्रीय कला अकादमीतर्फे काढण्यात आली विसर्जन मार्गावर रांगोळी

पुणे - दहा दिवस उत्साहात गणेशोत्सव ( ganpati festival 2023 ) साजरा करून आज सर्वजण बाप्पाला निरोप देणार, हा दिवस गणेश विसर्जन म्हणून ओळखला जातो. थोड्याच वेळात पुण्यातील गणेशोत्सवाला सुरवात होणार आहे. मानाच्या गणपती मंडळांची पुण्यातील टिळक पुतळा येथून विसर्जन मिरवणुकीला सुरवात होत आहे. अशाच पुण्यातील विसर्जन मार्गावर राष्ट्रीय कला अकादमीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून रांगोळी काढण्यात येत असतं. यंदाच्या वर्षी सायबर क्राईम (cyber crime) ही थीम घेऊन विसर्जन मार्गावर राष्ट्रीय कला अकादमीतर्फे रांगोळी काढण्यात येत आहे. विसर्जन मार्गावर (Visarjan route) ठिकठिकाणी सायबर क्राईमशी निगडित विविध संदेश देणाऱ्या रांगोळी या राष्ट्रीय कला अकादमीतर्फे काढण्यात येत आहे.

09:08 September 28

गणेश गल्लीतील मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक गिरगाव चौपाटीकडे मार्गस्थ

मुंबई : गणेश गल्लीतील मुंबईचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणरायाची विसर्जन मिरवणूक सकाळी साडेआठ वाजता गिरगाव चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ झाली. ढोल- ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईतील अनेक भाविकांनी तुफान गर्दी केली आहे. सध्या मुंबईचा राजा हा गणेश गल्लीतील मागच्या गल्लीतून मेघवाडी रस्त्यावर येऊन गिरगाव चौपाटीकडे मार्गस्थ होणार आहे.

08:38 September 28

मुंबईचा राजा हा गणेश गल्लीतून विसर्जनासाठी मार्गस्थ

मुंबई - नरे पार्कचा परळचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झालेला आहे. हा गणपती सध्या के ई एम हॉस्पिटलच्या परिसरात पोहोचला आहे. मुंबईचा राजा हा गणेश गल्लीतून विसर्जनासाठी मार्गस्थ झालेला आहे.

08:34 September 28

गणेश विसर्जनासाठी नागपूर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त

नागपूर : आजचा दिवस म्हणजे नागपूर शहर पोलिसांसाठी खऱ्या अर्थाने परीक्षेत असणार आहे. आज गणपती विसर्जनाबरोबरच ईदचा देखील बंदोबस्त पोलिसांना पार पाडावा लागणार आहे. दोन्ही मोठे सन एकाच दिवशी आल्याने सुरक्षेची फार मोठी जबाबदारी शहर पोलिसांवर आली आहे. आज सकाळी आठ वाजल्यापासून तर दुपारी एक वाजेपर्यंत ईदची मिरवणूक काढण्याची परवानगी देण्यात आली आहे, तर एकनंतर गणपती मंडळाच्या मिरवणुकांना सुरुवात होईल अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

यावर्षी नागपूर शहरात एकूण १ हजार २१२ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणपती मूर्तीची स्थापना केली होती. त्यापैकी ४५७ सार्वजनिक गणपती मंडळाच्या बाप्पाचे आज विसर्जन होणार आहे. उर्वरित बाकी मंडळाचे गणपती विसर्जन उद्या आणि त्यानंतर होईल, असे पोलीस आयुक्त यांनी सांगितले आहे.

५ हजार पोलीस कर्मचारी, अधिकारी तैनात : गणपती विसर्जन आणि ईदच्या मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी जवळपास पाच हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी नागपुरात वेगवेगळ्या ठिकाणी तैनात राहणार आहे. शहरातील काही रस्त्यावरची वाहतूक ठराविक कालावधीसाठी पर्यायी रस्त्याने वळवण्यात आली आहे. या शिवाय 1200 होमगार्ड व एसआरपीएफच्या दोन तुकड्या ही तैनात राहणार आहे.

08:19 September 28

पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

पुणे : भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाची सेवा केली आता लाडक्या गणरायाला निरोप देण्याची वेळ आली असून, पुण्यातील मानाच्या तसेच विविध गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. आज सकाळी साडे नऊ वाजता महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून विसर्जन मिरवणुकीची सुरुवात झाली आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपती मंडळाची आरती करुन विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाची हजेरी देखील विसर्जन मिरवणुकीत असल्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

07:47 September 28

Ganesh Visarjan Live Update

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक अनंत चतुर्दशीला म्हणजेच आज दुपारी चार वाजता थाटात निघणार आहे. यंदा श्री गणाधीश रथामध्ये दगडूशेठ गणपती बाप्पा विराजमान होणार असून, आकर्षक विद्युतरोषणाईने हा रथ उजळून निघणार आहे. आज सकाळी बाप्पाची मूर्ती उत्सवमंडपातून मंदिरात नेण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांकडून गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया.. मोरया मोरयाचा जयघोष करण्यात आला.

Last Updated : Sep 28, 2023, 8:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.