ETV Bharat / state

Ganesh Idol Immersion : एकीकडं बाप्पाच्या निरोपाचा जल्लोष दुसरीकडं विसर्जन हौदात 5 वर्षीय चिमुकल्याचा बुडून मृत्यू - गणेश उत्सवाला गालबोट

Ganesh Idol Immersion : पिंपरी चिंचवड परिसरातील मोशीत बाप्पाचं विसर्जन करताना पाच वर्षीय चिमुकल्याचा हौदात बुडून मृत्यू झाला. त्यामुळे बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत मोठी खळबळ उडाली. अर्णव आशिष पाटील असं विसर्जन हौदात बुडून मृत्यू झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे.

Ganesh Idol Immersion
विसर्जन हौद
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 29, 2023, 12:11 PM IST

पुणे Ganesh Idol Immersion : पाच वर्षीय चिमुकल्याचा विसर्जन हौदात बुडून मृत्यू झाल्यानं गणेश उत्सवाला गालबोट लागलं. ही धक्कादायक घटना पिपरी चिंचवड शहरातील ( Ganesh Idol Immersion ) मोशी इथं गुरुवारी सायंकाळी घडली. अर्णव आशिष पाटील असं हौदात बुडून मृत्यू झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे. चिमुकल्याचा विसर्जन हौदात बुडून मृत्यू झाल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

विसर्जन हौदात बुडून चिमुकल्याचा मृत्यू : मोशी इथं मिंत्रा सोसायटीमध्ये कृत्रिम विसर्जन हौद तयार करण्यात आला होता. त्या ठिकाणी विसर्जन करत असताना अर्णव हा हौदाजवळ गेला. त्याचा तोल जाऊन तो हौदामध्ये पडला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. चिमुकल्याचा विसर्जन हौदात पडून मृत्यू झाल्यानं विसर्जन मिरवणुकीत एकच खळबळ उडाली. विसर्जनापूर्वी प्रशासनानं सतर्कतेचं आवाहन केलं असतानाही केवळ एका नजरचुकीनं चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला.

पिंपरी चिंचवड शहरात बाप्पाला निरोप : पिंपरी चिंचवड शहरात गणपती बाप्पाला मोठ्या भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. पिंपरी चिंचवड परिसरातील भाविकांनी गणरायाला निरोप देताना मोठा जल्लोष केला. आकर्षक विद्युत रोषणाईनं आणि फुलांनी सजवलेल्या रथांतून बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली. दुपारी साडेचार वाजता सुरूवात झालेली मिरवणूक रात्री बारा वाजतापर्यंत म्हणजे साडेसात तास चालली. रात्रीबारापर्यंत 36 मंडळांनी विसर्जन केलं. मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. रात्री साडेआठ नंतर मिरवणुकीत रंगत आली. चिंचवड, चाफेकर चौकात महापालिकेच्या वतीनं स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. अनेक मंडळांचा बाप्पा विद्युत रोषणाई केलेल्या रथात विराजमान झाला होता. ढोल ताशा पथकं मिरवणूकीत सहभागी झाली होती. पथकानी उत्कृष्ट वादन केलं. बारा वाजेपर्यंत 36 मंडळांनी विसर्जन घाटाकडं रवाना होत शांततेत विसर्जन केलं.

हेही वाचा :

  1. Ganesh Visarjan २०२३ : 'बाप्पा' पुढच्या वर्षी लवकर या! अखेर लाडक्या 'लालबागच्या राजा'चं गिरगाव चौपाटीवर विसर्जन
  2. Ganesh Visarjan २०२३ : पुण्यात दुसऱ्या दिवशीही गणपती विसर्जन मिरवणूक; भक्तांमध्ये उत्साह कायम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.