ETV Bharat / state

Ganesh Festival 2023: श्री गणाधीश रथातून निघणार 'दगडूशेठ' गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक - गणेश फेस्टिवल 2023

Ganesh Festival 2023: श्रीमंत दगडूशेठ हलवाई (Dagdusheth Ganeshotsav) सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ट्रस्टच्या १३१ व्या वर्षानिमित्त आयोजित (Ganesha Immersion Pune) गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक अनंत चतुर्दशीला गुरुवार, दिनांक २८ सप्टेंबर रोजी थाटात निघणार आहे. यंदा श्री गणाधीश रथामध्ये (Shree Ganadhish Rath) दगडूशेठ गणपती बाप्पा विराजमान होणार आहे. आकर्षक विद्युत रोषणाईनं हा रथ उजळून निघणार आहे. (Immersion Procession of Dagdusheth Ganpati)

Ganesh Festival 2023
गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 27, 2023, 9:21 PM IST

दगडूशेठ गणपतीच्या रथाविषयी माहिती देताना ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी

पुणे Ganesh Festival 2023: विसर्जन मिरवणुकीसाठीचा श्री गणाधीश रथ हा भगवान श्रीगणेश आणि यंदाची सजावट असलेल्या अयोध्या श्रीराम मंदिर संकल्पनेला सुसंगत आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी दिली. श्री गणाधीश रथावर ८ खांब साकारण्यात आले आहेत. प्रत्येक खांबांवर हत्तीची मूर्ती साकारण्यात आली असून ते गजस्तंभ दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघणार आहेत. भगवान शंकरांच्या ८ गणांच्या मूर्ती रथावर असणार आहेत. त्यासोबतच मागील बाजूस दोन हनुमानाच्या मूर्ती आहेत. रथाचा आकार १५ बाय १५ फूट असून उंची २१ फूट इतकी आहे. रथावर १ मुख्य कळस बसविण्यात आला आहे. तसेच त्याच्याभोवती इतर असे मिळून पाच कळस असणार आहेत. आकर्षक रंगांमधील विविध लाईटस् रथावर वापरण्यात आले आहेत.

मिरवणुकीत आरोग्य रथ अग्रभागी असणार: सांगता मिरवणुकीबाबत माहिती देताना माणिक चव्हाण म्हणाले, मिरवणुकीत आरोग्य रथ अग्रभागी असणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा सामाजिक विषयांतर्गत आरोग्यविषयक जनजागृती रथावरून केली जाणार आहे. याखेरीज मिरवणुकीत प्रभात ब्रास बँड, दरबार ब्रास बँड, स्वरूप वर्धिनीचे ढोल-लेझिम पथक, सनई-चौघडा असा लवाजमा असेल. तसेच पुरुष भाविकांसह महिला गणेशभक्त मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

मिरवणुकीची परंपरा जपली जाणार: विसर्जन मिरवणुकीत 'दगडूशेठ' गणपती बाप्पाची मूर्ती दुपारी ४ च्या दरम्यान सहभागी होणार आहेत. मागील अनेक वर्षे दगडूशेठ गणपती बाप्पा विसर्जन मिरवणूक परंपरेप्रमाणे पार पडली. रात्री लक्ष्मी रस्त्यावर पोलीस प्रशासनाने मार्ग उपलब्ध करून दिल्यावर अनेक भाविक मिरवणुकीत सहभागी झाले आहेत. परंतु दरवर्षी निघायला होणारा उशीर खूपच वाढत चालला आहे. मागील वर्षी सकाळी ७.४५ वाजता बेलबाग चौकात बाप्पांचे आगमन झाले. भाविकांना बाप्पांच्या दर्शनासाठी खूप ताटकळत राहावे लागले. अशावेळी दुपारी ४ च्या दरम्यान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा विसर्जन मिरवणूक थाटात काढण्यात आली आहे.

हेही वाचा:

  1. Mumbai Police Traffic Advisory: मुंबईत गणेश विसर्जनानिमित्त उद्या 'असे' असेल वाहतुकीचे नियमन, काही रस्ते असणार बंद
  2. Ganesh Visarjan 2023 : गणपती विसर्जनासाठी मुंबई पोलीस सज्ज, २० हजार पोलिसांचा फौजफाटा असणार तैनात
  3. Ganeshotsav 2023: गणेश विसर्जनाची गिरगाव चौपाटीवर जोरदार तयारी, पालिका कर्मचाऱ्यांसह पोलिसांचा फौजफाटा तैनात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.