ETV Bharat / state

भोसरी पोलिसांनी पकडला १६ लाख रुपयांचा गांजा; एकास अटक, एक फरार - ganja

पुणे-नाशिक येथील महामार्गावर ई प्रभाग क्षेत्रीय कार्यालयाच्या जवळ अज्ञात दोन जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी अतिक युनिस शेख वय-२७ याला पोलिसांनी अटक केली आहे
author img

By

Published : Jul 14, 2019, 4:42 PM IST

पुणे- पिंपरी-चिंचवडमध्ये भोसरी पोलिसांनी एक क्विंटल गांजा पकडला असून त्याची किंमत तब्बल १६ लाख रुपये आहे. ही कारवाई भोसरी पोलिसांनी केली आहे. या प्रकरणी अतिक युनिस शेख (वय-२७) याला पोलिसांनी अटक केली आहे. तर रफिक शेख हा आरोपी फरार आहे. त्याचा शोध भोसरी पोलीस घेत आहेत.

देवेंद्र चव्हाण- गुन्हे पोलीस निरीक्षक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक येथील महामार्गावर ई प्रभाग क्षेत्रीय कार्यालयाच्या जवळ अज्ञात दोन जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, यांच्या मार्गदर्शनाखाली महेंद्र गाढवे यांचे पथक पहाटेच्या सुमारास संबंधित ठिकाणी गेले. तेव्हा, अतिक आणि रफिक हे मोटारीतून गांजाने भरलेल्या दोन गोणी खाली घेत होते. त्यावेळी पोलिसांची चाहूल लागताच आरोपी रफिक हा फरार झाला तर अतिक हा पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडे मिळालेल्या गोणीमध्ये १०१ किलो गांजा असल्याचे समोर आले. त्याची किंमत तब्बल १६ लाख रुपये असल्याची माहिती भोसरी पोलिसांनी दिली आहे.

ते कोणाला गांजा विक्री करण्यासाठी आले होते, याची चौकशी पोलीस करत आहेत. फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, गुन्हे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे, गणेश हिंगे, विपुल जाधव, सुमित देवकर, समीर रासकर, संतोष महाडिक, विकास फुले, बाळासाहेब विधाते, आशिष गोपी, सागर भोसले यांनी केली आहे.

Intro:mh_pun_01_100_kg_ganja_avb_10002Body:mh_pun_01_100_kg_ganja_avb_10002

Anchor:- पिंपरी-चिंचवडमध्ये भोसरी पोलिसांनी एक क्विंटल गांजा पकडला असून त्याची किंमत तब्बल १६ लाख रुपये आहे. सदरची कारवाई ही भोसरी पोलिसांची आहे. या प्रकरणी अतिक युनिस शेख वय-२७ याला पोलिसांनी अटक केली आहे. तर रफिक शेख हा आरोपी फरार आहे. त्याचा शोध भोसरी पोलीस घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक येथील महामार्गावर इ प्रभाग क्षेत्रीय कार्यल्याच्या जवळ अज्ञात दोन जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, यांच्या मार्गदर्शनाखाली महेंद्र गाढवे यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी पहाटे च्या सुमारास गेले. तेव्हा, अतिक आणि रफिक हे मोटारीतून दोन गांजाने भरलेली गोणी खाली घेत होते. त्यावेळी पोलिसांची चाहूल लागताच आरोपी रफिक हा फरार झाला तर अतिक हा पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडे मिळालेल्या गोनिमध्ये १०१ किलो गांजा असल्याचे समोर आले. त्याची किंमत तब्बल १६ लाख रुपये असल्याची माहिती भोसरी पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, ते कोणाला गांजा विक्री करण्यासाठी आले होते याची चौकशी पोलीस करत आहेत. तसेच फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, गुन्हे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे, गणेश हिंगे, विपुल जाधव, सुमित देवकर, समीर रासकर, संतोष महाडिक, विकास फुले, बाळासाहेब विधाते, आशिष गोपी, सागर भोसले यांनी केली आहे.

बाईट-: देवेंद्र चव्हाण- गुन्हे पोलिस निरीक्षकConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.