ETV Bharat / state

Pune Crime: उसने पैसे परत मागितल्याने मित्रानेच मित्राचा केला गेम; 2 फरारी आरोपींना पोलिसांकडून अटक - मित्रानेच मित्राचा खून

पुणे महाड वरंध घाटात एक बेवारस मृतदेह आढळला होता. महाड मार्गावरील बेवारस मृतदेहाच गुढ तपास लावण्यात पोलीसांना यश आले आहे. उसने घेतलेल्या पैशाची वारंवार मागणी करत असल्यामुळे मित्रानेच मित्राचा खून केल्याचे तपासात समजले आहे.

Pune Crime
मित्रानेच मित्राचा केला खून
author img

By

Published : Mar 29, 2023, 7:18 AM IST

उसने पैसे परत मागितल्याने मित्रानेच मित्राचा केला खून

पुणे: उसने पैसे परत मागण्याचा तगादा लावल्याने दृश्यम सिनेमा स्टाईलने मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना घडली होती. अक्षय होळकर, समीर शेख, यांनी दत्तात्रय पिलाणे याचा खुन केला होता. दोघा फरारी आरोपींना पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे. पुण्याच्या भोर स्टेशनच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

अकस्मात मृत्यूची नोंद: अक्षय सुनील होळकर, (वय 30 रा. आंबेगाव पुणे ) आणि समीर मेहबूब शेख (वय 45 रा. पिंपरी ) आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोर तालुक्यातील वरवंड गावच्या हद्दीत एक अनोळखी मृतदेर असल्याचे, भोर पोलीस स्टेशनला पोलीस पाटील सुधीर दिघे यांनी खबर दिली होती. त्यानुसार भोर पोलीसानी घटनास्थळी जाऊन, पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.

फोटो वरून घातपाताची शंका: सिंहगड पोलीसमधील तक्रारीनुसार दत्तात्रय शिवराम पिलाणे, (वय-३२ रा.आंबेगाव मूळ रा. महुडे ता.भोर) हा मित्र, अक्षय सुनील होळकर याला मला काम आहे असे बोलून गेला होता. भोर पोलीस स्टेशनला दाखल असलेले मयताचे फोटोवरून घातपाताची शंका आल्याने पोलिसांनी कौशल्यपुर्ण अधिक तपास केला. तपास पथक व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांचे तपास पथकाने सापळा रचून, आरोपींना ताब्यात घेवून त्यांच्याकडे सखोल चौकशी केली. त्यावेळी आरोपींनी खुनाची कबुली दिली.

डोक्यात लोखंडी हातोड्याने वार: चौकशीत अक्षय होळकर याने सांगितले की, मयत दत्तात्रय पिलाणे हा माझा मित्र होता. त्याच्याकडून पाच ते सहा लाख रुपये वर्षभरात घेतले होते. त्या पैशाची तो मला वारंवार मागणी करून त्रास देत होता. या कारणावरुन त्याचा समीर शेख याचे मदतीने दि.१० मार्च रोजी, दत्तात्रय पिलाणे यास बोलावुन घेवुन माझी ईको गाडीमध्ये बसवून गाडीतच दत्तात्रय याचे डोक्यात लोखंडी हातोड्याने मारले. तसेच आरोपी समीर याने गळ्यावर व पोटावर चाकुने वार करून खुन केला. अंगावर कपडे नसलेला मृतदेह ईको गाडीतुन वारखंड गावचे हद्दीत, भोर महाड रोडचे कडेला उताराला झाडा-झुडपात फेकुन दिला. तेव्हा भोर पोलीस स्टेशनकडील दत्तात्रय पिलाने यांचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले.

यांनी केली कारवाई : वरील कामगिरी पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड धनंजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली भोर पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पुणे, ग्रामीण अविनाश शिळीमकर व स्थानिक गुन्हे पथक पोलीस, भोर पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांनी केली. याचबरोबर स्थानिक गुन्हे शाख पुणे ग्रामीण, पोलीस हवालदार सचिन घाडगे, अजित भुजबळ, राजु मोमीन, अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, पो.कॉ. मंगेश भगत तसेच भोर पोलीस हवालदार उध्दव गायकवाड, विकास लगस, अविनाश निगडे, यशवंत शिंदे, निलेश सटाले, दतात्रय खेंगरे, शोकत शेख, पोकॉ. सागर झेंडे, वर्षा भोसले, प्रियंका जगताप, पोलीस पाटील सुधीर दिघे व एस. एन. गायकवाड ( पोलीस हवादार सिंहगड रोड पोलीस स्टेशन ) यांनी ही कारवाई केली आहे.

हेही वाचा: Pune suicide case महिलांनी मारहाण केल्याने रिक्षाचालकाने खाणीत उडी मारली रिक्षाचालकाचा अखेर मृतदेह सापडला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.