पिंपरी-चिंचवड - पिंपरी-चिंचवडमध्ये प्रेम प्रकरणातून 18 वर्षीय तरुणाचा अल्पवयीन मित्रांनी अपहरण करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. कृष्णा रेळेकर, असे हत्या करण्यात आलेल्या अठरा वर्षीय तरुणाचे नाव आहे. अल्पवयीन मुलीवर चार जणांचे प्रेम होते. तसेच कृष्णाला अल्पवयीन मुलगी बोलायची, याच कारणावरून 7- 8 जणांनी कृष्णाचे राहत्या घरातून दोन दिवसांपूर्वी अपहरण केले. चाकण हद्दीतील शेलपिंपळगाव येथे त्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. या प्रकरणी 23 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात राहत असलेल्या कृष्णा रेळेकरचे राहत्या घरातून मित्रांनी अपहरण म्हणजे सोबत घेऊन गेले. तेव्हा त्याची आई घरीच होती. परंतु, मित्र असल्याने काही बोलली नाही. मात्र, कृष्णा परत आलाच नाही. त्यांनी सर्वत्र शोध घेतला. एका महिलेने सांगितले की कृष्णाला दोघे जण मारहाण करत होते. या प्रकरणी कृष्णाच्या आईने भोसरी एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत 7- 8 जणांपैकी 23 वर्षीय आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या अपहरण आणि हत्या प्रकरणात सात अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणातील सात अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे पुढे येत असून ते फरार आहेत.
हेही वाचा - Cannabis Smuggler Arrested : ठाण्यात ऑटो रिक्षातून गांजाची तस्करी; १५ किलो गांजासह तस्कर अटक