पुणे - पुण्याच्या कोथरूड परिसरात दोन दिवसांपूर्वी एका 13 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळला होता. कोथरूड पोलिस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून याप्रकरणी यावर्षी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खेळण्याच्या वादातून हा खून झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
विश्वजीत वंजारी (वय 11) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. केळेवाडी परिसरात तो राहत होता. 29 जानेवारीपासून तो बेपत्ता होता. कोथरूड पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल होता. याप्रकरणी त्याच्या आईने फिर्याद दिली होती.
या मुलाचा शोध घेत असताना रविवारी दुपारच्या सुमारास पौड रस्त्याशेजारी असणाऱ्या एका निर्जन ठिकाणी त्याचा मृतदेह सापडला होता. तपासादरम्यान पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्यानेच खून केल्याची कबुली दिली.
मृत आणि आरोपी दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते. दररोज ते एकत्रच खेळायचे. घटनेच्या दिवशीही ते एकत्रच लपाछपी खेळत होते. खेळत असताना सारखा डाव आपल्यावरच येतो याचा राग आल्याने आरोपीने विश्वजितला ढकलून दिले होते. यात डोक्याला जबर दुखापत झाल्याने विश्वजित निपचित पडला होता. त्यानंतर घाबरलेल्या आरोपीने पुन्हा त्याच्या डोक्यात दगडाने वार केले आणि त्याचा खून केला. त्यानंतर जवळच पडलेल्या विटा मृतदेहावर टाकून तो तिथून निघून गेला.
मित्रानेच केला कोथरूडमधील 'त्या' बेपत्ता मुलाचा खून - कोथरुडमधील बेपत्ता मुलाचा खून
पुण्याच्या कोथरूड परिसरात दोन दिवसांपूर्वी एका 13 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळला होता. खेळण्याच्या वादातून हा खून झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.