ETV Bharat / state

म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर 'महात्मा फुले जनआरोग्य योजने'तून मोफत उपचार - राजेश टोपे - राज्यात म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर मोफत उपचार

कोरोना रुग्ण म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराने ग्रस्त असून त्याची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली आहे. या आजाराच्या जनजागृतीसाठी मोहीम हाती घेण्यात आली असून म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर 'महात्मा फुले जनआरोग्य योजने'तून मोफत उपचार करण्यात येणार आहे.

free tratment for mucormycosis patient
म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर 'महात्मा फुले जनआरोग्य योजने'तून मोफत उपचार
author img

By

Published : May 10, 2021, 8:15 PM IST

मुंबई - राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराने ग्रस्त असून त्याची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली आहे. या आजाराच्या जनजागृतीसाठी मोहीम हाती घेण्यात आली असून म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर 'महात्मा फुले जनआरोग्य योजने'तून मोफत उपचार करण्यात येतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

म्युकरमायकोसीस विषयी जनजागृती -

ज्या कोरोना रुग्णांना मधुमेह आहे. तसेच ज्यांचा मधुमेह नियंत्रित नाही, अशा रुग्णांमध्ये म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराचे लक्षण आढळून येत आहे. नाकाजवळ किंवा ओठाजवळ काळसर ठिपका येणे, असे या आजाराचे लक्षणे आहेत. या आजारावर लवकर उपचार न केल्यास श्वसन, मेंदू, डोळ्यांवर विपरी परिणाम होत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. तसेच या संदर्भात जनजागृती करणार असल्याचेही ते म्हणाले.

म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर मोफत उपचार -

या आजावरील औषध महागडे असल्याने गरीबांना या आजारावरील उपचार आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सहभागी असलेल्या १००० रुग्णालयांमध्ये या आजाराच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातील, असेही टोपे यांनी सांगितले. म्युकरमायकोसीस आजारावरील इंजेक्शनदेखील चढ्या दराने विक्री केली जात असल्याच्या तक्रारी असून त्यांची किंमत निश्चित करून त्यावर नियंत्रण आणले जाईल, असेही ते म्हणाले. या आजारामुळे कोरोना रुग्णांनी घाबरून न जाता मधुमेह असणाऱ्यांनी तो नियंत्रीत ठेवावा. त्यासाठी व्यायाम, योग्य आहार आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करून घेण्याचे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले.

हेही वाचा - मराठा समाज आक्रमक; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची बीडमध्ये केली होळी

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.