पुणे : सत्तासंघर्षानंतर राज्यात मोठी उलतापालथ पाहायाला मिळाली. शिवसेनेचे कट्टर नेते मानले जाणारे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड करत भाजपसोबत जात, राज्यात नवं राज्य आणलं. त्यानंतर बंडासंदर्भात अनेक खुलासे झाले. नेमकं एकनाथ शिंदे यांनी हे पाऊल का उचललं? यावर माजी मंत्री विजय शिवतारे यांनी शिंदे यांच्या मनात उठावाचं बीज मीच पेरलं होतं, अशा गौप्यस्फोट (Former minister Vijay Shivtare secret blast) केला आहे.
कीर्ती पाठक यांची टिका : यावर आत्ता उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray sisterinlaw Kirti Pathak) यांच्या आत्ते बहीण कीर्ती पाठक यांनी जोरदार टिका (Kirti Pathak strongly criticized Shivtare) केली आहे. 'विजय शिवतारे शिंदे गटातला सुपर गद्दार आहे. विजय शिवतारे यांनी त्याच्या पापाची कबुली दिली. आधी बापू म्हटलं की, कोकणातल्या गरीबीच्या बापूची आठवण यायची. आता आपल्याकडे एक निर्लज्ज असा पुरंदरचा बापू आहे. घरच्या महिलेला फसवत तीन लग्न करणारा, असा हा पुरंदरचा बापू आहे, असे म्हणत कीर्ती पाठक यांनी विजयबापू शिवतारेंना धारेवर धरत जोरदार टिका केली आहे. तर विजय शिवतारे यांना निवडणुकीत संपूर्णपणे गाडा असं आवाहन शिवसैनिकांना कीर्ती पाठक यांनी केलं आहे.
मनात उठावाचं बीज पेरलं : 'राज्यात महाविकास आघाडी सरकार आलं होतं, ते महाराष्ट्राच्या हिताचं नव्हतं. पहिल्या दोन महिन्यातच मी आघाडी सरकारच्या विरोधात उचल खाल्ली होती. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर दोन महिन्यानंतरच मी नंदनवनला गेलो होतो. एकनाथ शिंदे यांच्याशी साडेचार तास चर्चा केली आणि त्यांच्या मनात उठावाचं बीज पेरलं', असा गौप्यस्फोट विजय शिवतारे यांनी केला.
भाजपनेही शिवसेनेचे मंत्री पाडले : नंदनवनमध्ये साडेचार तास चर्चा करताना मी एकनाथ शिंदे यांना सांगितलं, हे चालणार नाही. हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही. तुम्ही उद्धव ठाकरेंना सांगा. प्रेशर करा हे तोडलं पाहिजे. भाजप सेनेचं सरकार आलं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे यांनी आपल्या 70 सीट घालवल्या. उद्धव ठाकरेंनी भाजपच्या मतदारसंघात माणसं कामाला लावली. त्यामुळे भाजपनेही शिवसेनेचे मंत्री पाडले. हे सर्व उद्धव ठाकरे यांच्यामुळेच झालं, असंही त्यांनी सांगितलं.