बारामती : आम्ही मराठ्यांचे नेते आहोत असे सांगतात परंतू महाराष्ट्रातील मराठा नेते जर कोणी संपवले असतील तर ते पवारांनी संपवले असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री विजय शिवतारे यांनी बारामतीत बोलताना ( Vijay Shivtare criticize Sharad Pawar ) केला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेनेच्या विस्तारासाठी माजी मंत्री विजय शिवतारे बारामती इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर ( Vijay Shivtare Baramati tour )आहेत.
ईस्टइंडिया कंपनीचे उदाहरण : ईस्टइंडिया कंपनीचे उदाहरण देत शिवतारे म्हणाले की, ईस्टइंडिया कंपनीने व्यवहार करत अख्या देशावर कब्जा करून लंडनला निघून गेली. आणि महाराष्ट्रात पवार कंपनी आली. बारामती, इंदापूर तालुक्यातील साखर कारखाने काकडे, शेम्बेकर, जाचक यांनी मोठ्या मेहनतीने उभारले. मात्र सत्ता आणि पैशाच्या जोरावर कारखाने ताब्यात घेतले. सत्तेचा गैरवापर करून भ्रष्टाचारातून ( government power Corruption ) जमवलेल्या पैशातून निवडणुका जिंकायच्या असा घनाघातही यावेळी त्यांनी केला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : मुख्यमंत्री कोणीही झाले तरी बारामतीत सत्ताकेंद्रा बाहेर पडले नाही पाहिजे. कोणी ऐकत नसेल तर दुसऱ्याचे नाव सुचवले जाते त्यामुळे सर्व हाजी हाजी करतात. मात्र खऱ्या अर्थाने हे सत्ता केंद्र कोणी हलवले असेल आणि पहिल्यांदा कोणी चेकमेट केले असेल तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असेही शिवतारे म्हणाले.
बारामती लोकसभा : बारामती लोकसभा मतदारसंघाचा सातबारा कुणाच्या नावे नाही. हा सातबारा जनतेच्या हाती आहे. माझी लढाई परिवाराशी नसून प्रवृत्तीची आहे. जनतेची इच्छा असेल आणि सर्व पक्षांनी सांगितले तर राष्ट्रवादीच्या विरोधात बारामती लोकसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवण्यास केव्हाही तयार असल्याचेही शिवतारे ( Sharad Pawar finished Maratha leader ) म्हणाले.