ETV Bharat / state

शिरुर तालुक्याच्या म्हसोबावाडीत बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद - pune

शिरुर तालुक्यातील म्हसोबावाडीत बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बुधवारी (31 ऑगस्ट) दुपारी जेरबंद झाला आहे. मागील अनेक दिवसांपासून या परिसरामध्ये बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, आता बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने सुटकेचा निश्वास सोडला आहे.

पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या
author img

By

Published : Aug 1, 2019, 5:06 AM IST

पुणे - शिरुर तालुक्यातील म्हसोबावाडीत बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बुधवारी (31 ऑगस्ट) दुपारी जेरबंद झाला आहे. मागील अनेक दिवसांपासून या परिसरामध्ये बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, आता बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने सुटकेचा निश्वास सोडला आहे.

शिरुर तालुक्याच्या म्हसोबावाडीत बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद

वाल्मीक नागवडे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या अलगद अडकला आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने काही दिवसांपासून येथे पिंजरा लावला होता. यापूर्वी मांडवगण फराटा येथे महिन्यापूर्वी एक बिबट्या जेरबंद झाला होता. बिबट्या जेरबंद होण्याची ही परिसरातील पाचवी घटना आहे. तसेच एक बिबट्या विहिरीत पडून मृत्युमुखी पडला होता. त्यामुळे या परिसरात आणखी बिबटे असून वनविभागाने त्यांना पकडण्यासाठी पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मांडवगण फराटा परिसरामध्ये बिबट्याचा वावर वाढला होता. तसेच या परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या-मेंढ्या ठार केल्या होत्या. रात्री-अपरात्री शेतामध्ये पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना बिबट्याने अनेक वेळा दर्शन दिले आहे. त्यामुळे शेतकरी रात्रीच्या वेळेस शेतात पिकांना पाणी देण्यासाठी धजावत नव्हते.

Intro:Anc__शिरुर तालुक्यातील म्हसोबावाडीत बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात आज दुपारी जेरबंद झाला आहे गेले अनेक दिवसांपासून या परिसरामध्ये बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला होता त्यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते मात्र आता बिबट्या पिंज-यात जेरबंद झाल्याने सुटकेचा निश्वास सोडला आहे

वाल्मीक नागवडे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या अलगद अडकला आहे बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने काही दिवसापासून येथे पिंजरा लावला होता यापूर्वी मांडवगण फराटा येथे महिन्यापूर्वी एक बिबट्या जेरबंद झाला होता. बिबट्या जेरबंद होण्याची ही परिसरातील पाचवी घटना आहे. तसेच एक बिबट्या विहिरीत पडून मृत्युमुखी पडला होता. त्यामुळे या परिसरात आणखी बिबट असून वनविभागाने त्यांना पकडण्यासाठी पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मांडवगण फराटा परिसरामध्ये बिबट्याचा वावर वाढला होता तसेच या परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्यामेंढ्या ठार केल्या आहेत. रात्री-अपरात्री शेतामध्ये पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना बिबट्याने अनेक वेळा दर्शन दिले आहे. त्यामुळे शेतकरी रात्रीच्या वेळेस शेतात पिकांना पाणी देण्यासाठी धजावत नव्हते.Body:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.