भीमाशंकर (पुणे )- कोरोनाचा फटका ज्याप्रमाणे अर्थव्यवस्थेला बसला आहे. त्याप्रमाणे मंदिराच्या तिजोरीलाही याची झळ पोहोचली आहे. इतिहासात पहिल्यांदा भीमाशंकर देवस्थानचे उत्पन्न शून्यावर आले आहे.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानला कोरोनाचा मोठा फटका बसत असल्याने देवस्थानला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. भीमाशंकर देवस्थानचं उत्पन्न पहिल्यांदाच शुन्यावर आले आसून. मागील एक वर्षापासुन कोरोना महामारीच्या संकटामुळे भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे येथील दानपेट्या रिकाम्याच राहिल्या आहेत.
दर्शनासाठी देशाभरातुन येणाऱ्या लाखों भाविकांची संख्या अचानक थांबली. पर्यायाने देवस्थानचे उत्पन्न पुर्ण थांबले आहे, मात्र देवस्थानचा महिन्याचा खर्च मात्र सुरुच असुन कामगार पगार, इतर खर्च देवस्थान साठवणुकीतील ठेवीमधुन करत आहेत. परंतु श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान भाविकांसाठी बंद असल्याने पुजारी, गुरव व छोटे मोठे व्यावसायिक यांच्यावर मोठं आर्थिक संकट उभं राहिलं असल्याची माहिती पुजारी कौदरे यांनी दिली.
भीमाशंकर महारुद्र पूजेवर निर्बंध
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे षष्ठी ते नवमी असा सात दिवसांचा महारुद्र सुहाकार सोहळा केला जात असतो. या सोहळ्यात हवन, किर्तन प्रवचन जागर अन्नदान केले जाते. मात्र यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महारुद्र सुहाकार सोहळ्यावर निर्बंध आले आहेत