ETV Bharat / state

Seized Stock of Sweets: दिवाळीत मिठाई आणताय, सावधान! एफडीए तपासणीत मोठा भेसळयुक्त साठा जप्त - अन्न व औषध प्रशासन

पुण्यात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केलेली (seized stock of sweets during diwali) आहे. अन्न व औषध प्रशासनाने दिवाळीच्या तोंडावरच पाच लाख 90 हजार 400 रुपयांचा मिठाईचा साठा जप्त केला (Food and Drug Administration) आहे.

Seized Stock of Sweets During Diwali
दिवाळीत मिठाईचा साठा जप्त
author img

By

Published : Oct 21, 2022, 1:35 PM IST

पुणे : सण आणि उत्सव आले (diwali 2022) की, गोडधोड पदार्थ घेण्यासाठी लोकांची खरेदी असते. अशातच मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये भेसळ होते. त्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून दसरा-दिवाळीनिमित्त अन्न तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. यात पुण्यात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केलेली (seized stock of sweets during diwali) आहे.

मिठाईचा साठा जप्त : अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) दिवाळीच्या तोंडावरच पाच लाख 90 हजार 400 रुपयांचा मिठाईचा साठा जप्त केला आहे. बर्फी आणि हलवा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सहा मिठाईचे नमुने तपासणी प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याचे ‘एफडीए’कडून गुरुवारी सांगण्यात आले.

अन्न तपासणी मोहीम : दिवाळीच्या पार्श्वभूमिवर ‘एफडीए’तर्फे अन्न तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत मिठाई बरोबरच रवा, मैदा, बेसन, तेल, वनस्पती तूप हे अन्न पदार्थ जप्त करून त्याचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत ७० नमुने घेतले. दसऱ्यापासून ते आतापर्यंत वेगवेगळ्या अन्न पदार्थांचे ७० नमुने घेण्यात आले आहेत. ते नमुने तपासण्यासाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.

कायदेशीर कारवाई : अशोक राजाराम चौधरी यांच्या वाहनातून गुजरात बर्फी, स्वीट हलवा, रिच स्वीट डिलाईट, स्वीट हलवा, स्पेशल बर्फी अशा वेगवेगळ्या मिठाईचे नमुने तपासण्यासाठी राज्य अन्न आरोग्य प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. ही गुजरात बर्फी पुण्यातील अग्रवाल स्वीट्स बुधवार पेठ, मंडई, कृष्णा डेअरी फार्म मानस सरोवर, अँनेक्स, कोंढवा बुद्रुक अशोक राजाराम चौधरी गहुंजे, देहूरोड आणि हिरसिंग राजाराम पुरोहित बालेवाडीयांनी मागविली असल्याचे तपासात समोर आले आहे. गुजरात बर्फीचा वापर कशासाठी करण्यात येत होता ? याबाबत अधिक तपास सुरू आहे. त्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती ‘एफडीए’च्या पुणे विभागाचे सहआयुक्त अन्न संजय नारागुडे यांनी (seized stock of sweets In Pune) दिली.

खाद्य तेलाच्या डब्यांचा पुनर्वापर : खाद्य तेलाच्या डब्यांचा पुनर्वापर केल्याचे तीन ठिकाणी आढळून आले. त्यातून चार लाख ५१ हजार ४०० रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आले. हिरवा वाटाणा ३९ हजार ८०० रुपये, मिठाई 6हजार ७५० रुपये, खवा 12 हजार 400 रुपये, असा माल जप्त केल्याचे सहआयुक्त अन्न संजय नारागुडे यांनी (Seized Stock of Sweets) सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.