ETV Bharat / state

परिस्थितीला कंटाळून 21 वर्षीय लोककलावंताची पुण्यात आत्महत्या - पुणे बातमी

अपघातातमुळे चेहऱ्यावर झालेल्या जखमा व टाळेबंदीमुळे काम मिळसल्याने नैराश्यातून पुण्यातील 21 वर्षीय लोककलावंत विशाखा काळे यांनी गळफास घेत आत्महत्या केली.

विशाखा काळे
विशाखा काळे
author img

By

Published : Oct 7, 2020, 8:52 PM IST

पुणे - अपघातामुळे आलेले व्यंग आणि परिस्थितीला कंटाळून पुण्यात लोककलावंत असलेल्या विशाखा काळे (वय 21) यांनी बुधवारी (6 ऑक्टोबर) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी गर्जा महाराष्ट्र, महाराष्ट्राची गौरव गाथा, महाराष्ट्राची लोकधारा यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमासह लावण्यांच्या कार्यक्रमातही काम केले होते. पुण्यातील हडपसर परिसरात त्या राहण्यास होत्या.

हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी तिचे आई-वडील व बहीण काही कामानिमित्त बाहेर गेले होते. त्याच वेळी विशाखाने गळफास घेऊन आत्महत्या केली. विशाखा काळे यांच्या घरची परिस्थिती हलाखीची होती.

विशाखाच्या बहिणीने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, वर्षाभरापूर्वी विशाखाचा अपघात झाला होता. या अपघातामुळे तिच्या चेहर्‍यावर काही जखमा झाल्या होत्या. त्यामुळे मागील एक वर्षभरापासून नैराश्यात होती. त्यात टाळेबंदी सुरू झाल्यामुळे काही काम मिळत नव्हते. त्यामुळे नैराश्य वाढतच गेले आणि यातूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलले. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात गुन्ह्याची नोंद केली आहे.

हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू, रुग्णालयाने घेतले वाढीव आयसीयू चार्जेस

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.