पुणे - शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱयासह पाऊसाचे अचानक आगमन झाल्याने पुणे-नाशिक महामार्गावरुन जाणाऱ्या प्रवाशांची धावपळ झाली. अशातच पुणे-नाशिक महामार्गावरील कळंब येथे एका झाडाखाली प्रवासी उभे असताना वादळीवाऱयात प्रवाशांच्या अंगावर झाड पडल्याची घटना घडली. दरम्यान, या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले असून जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पुणे-नाशिक महामार्गालगत पावसाची जोरदार हजेरी सुरू होताच प्रवासी झाडाखाली उभे राहिले असताना झाड अचानक नागरिकांच्या अंगावर पडल्याची घटना घडली. यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले असून पाच दुचाकी व एका कारचे नुकसान झाले आहे. पोलीस व स्थानिक नागरिकांच्या मदतीने महामार्गावर पडलेले झाड जेसीबीच्याने बाजुला करण्यात आले. त्यानंतर पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असताना नागरिकांना घरात रहा असे आवाहन केले जाते, तरीही नागरिक रस्त्यावर येऊन प्रवास करतात.