ETV Bharat / state

लाळ गळते म्हणून जीवंत मासा तोंडात फिरवणे पडले महागात - girl

दुर्बिणीच्या साहाय्याने शस्त्रक्रिया करुन तो मासा बाहेर काढण्यात आला. ही शस्त्रक्रिया १० मिनिटे चालली. बाळाचा श्वास व्यवस्थित सुरू झाल्यानंतर डॉक्टरांनी सुटकेचा श्वास टाकला.

author img

By

Published : Feb 1, 2019, 11:12 PM IST

Updated : Feb 4, 2019, 6:04 PM IST

पुणे - मुलीच्या तोंडातून लाळ गाळते म्हणून जिवंत मासा तोंडातून फिरवला तर, लाळ गळायची बंद होते, असा काहींचा समज आहे. ऐकीव माहितीच्या आधारे ऊसतोड महिलेने मुलीच्या तोंडात जिवंत मासा फिरवला. मात्र, मासा तोंडातून फिरवत असताना तो बाळाच्या अन्ननलिकेत जाऊन अडकला.

शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर
त्यामुळे साडेचार महिन्याच्या चिमुकलीची आयुष्याशी लढाई सुरू झाली. शिर्सूफळहून बारामतीला आणेपर्यंत तिचा श्वासही बंद झाला. बारामतीतील डॉक्टरांनी औषधे देऊन तिचे प्राण वाचविले. मूळच्या जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावचे बापू माळी याचे कुटुंब भिमा पाटस कारखान्याच्या ऊस तोडणीसाठी बारामती तालुक्यात आले आहेत. ते शिर्सूफळ येथे वास्तव्यास आहेत. बापू यांना साडेचार महिन्याची मुलगी आहे. तिचे नाव अनू असून जन्मल्यापासूनच तिच्या तोंडातून लाळ गळते. यावर उपाय म्हणून अनूच्या मावशीच्या अर्धवट माहितीतून पाण्याच्या पाटचारीत मासा शोधला. लहान आकाराचा जिवंत मासा आणून तो अनुच्या तोंडातून फिरवायचा प्रयत्न केला. मात्र, मासा बुळबुळीत असल्याने तो निसटून अनूच्या तोंडातून अन्ननलिके श्वासनलिकेपर्यंत गेला. हे पाहताच बापू माळी याने दुचाकी घेऊन बारामतीला धाव घेतली.
undefined

बारामतीचे डॉ. मुथा यांच्या दवाखान्यात चिमुकल्या अनुला आणण्यात आले. मात्र, तोपर्यंत तिचा श्वास बंद झाला होता. डॉ. राजेंद्र मुथा आणि सौरभ मुथा यांनी तिच्या छातीवर जीवन संजीवनी (सीपीआर) क्रिया करण्याचा प्रयत्न करीत हृदय पुन्हा चालू करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लागेच तिच्यावर दुर्बिणीच्या साहाय्याने शस्त्रक्रिया करुन तो मासा बाहेर काढण्यात आला. ही शस्त्रक्रिया १० मिनिटे चालली. बाळाचा श्वास व्यवस्थित सुरू झाल्यानंतर डॉक्टरांनी सुटकेचा श्वास टाकला. चिमुकलीच्या आई-वडिलांना डॉक्टरांचे आभार कसे मानावेत हेच सुचत नव्हते. डोळ्यातील पाण्यानेच त्यांनी डॉक्टरांविषयीची कृतज्ञता व्यक्त केली.

Intro:r mh pune 04 01feb19 fish in childs respirayory r waghBody:r mh pune 04 01feb19 fish in childs respirayory r wagh

anchor
साडेचार महिन्याच्या मुलीच्या तोंडातून लाळ गाळते म्हणून जिवंत मासा तोंडातून फिरवला तर, लाळ गाळायचे बंद होते .या अर्धवट माहितीने,ऊसतोड करणाऱ्या महिलेने मुलीच्या तोंडात चक्क जिवंत मासा फिरवला आणि काय गुळगुळीतपणामुळे मासा निसटून थेट लहान बाळाच्या अन्ननलिकेत जाऊन अडकला..आणि त्या चिमुकलीची आयुष्याशी लढाई सुरू झाली.. शिर्सूफळहून बारामतीला आणेपर्यंत तिचा श्वासही बंद झाला, पण बारामतीतील देवदूतांनी तिला जीवन संजीवनी देऊन प्राण वाचविलेत. मूळ चाळीसगाव (जि. जळगाव) येथील बापू माळी याचे कुटुंब भिमा पाटस कारखान्याच्या ऊस तोडणीसाठी बारामती तालुक्यात आले आहे. ते शिर्सूफळ येथे असून गुरुवारी दुपारी बापू यांची साडे चार महिन्यांची मुलगी अनू ही जन्मल्यापासून तोंडातून लाळ गाळते म्हणून तिच्या मावशीने कोणीतरी सांगितले म्हणून अर्धवट माहितीतून पाण्याच्या पाटचारीत मासा शोधला. बोटुकलीच्या आकाराचा जिवंत मासा तिने आणून तो त्या लहानग्या अनुच्या तोंडातून फिरवायचा प्रयत्न केला, मात्र मासा बुळबुळीत असल्याने तो निसटून अनूच्या थेट अन्ननलिकेतून श्वासनलिकेपर्यंत गेला आणि तिचा जीव घुसमटला. हे पाहताच बापू माळी याने दुचाकी घेऊन बारामतीला धाव घेतली.
बारामती येथील डॉ. मुथा यांच्या दवाखान्यात धावतच चिमुकल्य़ा अनुला आणण्यात आले, मात्र तोपर्यंत तिचा श्वास बंद झाला होता. डॉ. राजेंद्र मुथा, सौरभ मुथा यांनी तिच्या छातीवर जीवन संजीवनी (सीपीआर) क्रिया करण्याचा प्रयत्न करीत हृदय पुन्हा चालू करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आणि त्यानंतर लागलीच तिच्यावर दुर्बिँणीच्या सहाय्याने तिच्यावर शस्त्रक्रिया करून तो मासा बाहेर काढण्यात आला. ही शस्त्रक्रिया दहा मिनीटे चालली, बाळाचा श्वास व्यवस्थित सुरू झाल्यानंतर तिला तोपर्यंत जे झटके येत होते, ते कमी होण्याची इंजेक्शने देऊन तिची प्रकृती स्थिर करण्यात आली आणि डॉक्टरांनी सुटकेचा श्वास टाकला. चिमुकलीच्या आईवडीलांना तर डॉक्टरांचे आभार कसे मानावेत हेच सुचत नव्हते, त्यांनी डोळ्यातील पाण्यानेच डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

Byte -डॉक्टर सौरभ मुथा ,बालरोग तज्ञ बारामती

Conclusion:
Last Updated : Feb 4, 2019, 6:04 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.